Home आपला जिल्हा Breaking News नव्या नवरीच्या आधार कार्डवर आडनाव बदलायचेय? कागदपत्रांची सविस्तर माहिती

नव्या नवरीच्या आधार कार्डवर आडनाव बदलायचेय? कागदपत्रांची सविस्तर माहिती

305

लग्नानंतर मुलींच्या आयुष्यात अनेक बदल होतात, त्यापैकी एक म्हणजे नाव किंवा आडनाव बदलणे. कायदेशीर सोपस्कार आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डवरील माहिती अपडेट असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता नव्या नवरीला आपले आडनाव बदलण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; ही प्रक्रिया तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीनेही पूर्ण करू शकता.

बँक खाते, पॅन कार्ड किंवा इतर महत्त्वाच्या कागदपत्रांवर लग्नानंतरचे नाव लावण्यासाठी आधार कार्ड हे मुख्य पुरावा ठरते. आधारवर आडनाव बदलताना योग्य कागदपत्रांची जोडणी करणे आवश्यक असते, जेणेकरून तुमचा अर्ज फेटाळला जाणार नाही.
आजच्या या विशेष लेखात आपण लग्नानंतर आधार कार्ड अपडेट करण्याची अधिकृत पद्धत आणि त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची सविस्तर माहिती घेणार आहोत.
लग्नानंतर आधार कार्ड अपडेट करणे हे केवळ नावापुरते मर्यादित नसून, पत्ता बदलण्यासाठीही ते महत्त्वाचे ठरते. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) च्या नवीन नियमांनुसार (2026), ही प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यात आली आहे.
आवश्यक कागदपत्रे
• नाव किंवा आडनाव बदलण्यासाठी खालीलपैकी कोणतेही एक कागदपत्र ‘ओळखीचा पुरावा’ म्हणून वापरता येते:
.
• विवाह नोंदणी प्रमाणपत्र (Marriage Certificate): हा सर्वात महत्त्वाचा आणि अधिकृत पुरावा आहे.
• राजपत्रित अधिकारी स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र : जर मॅरेज सर्टिफिकेट नसेल, तर विहित नमुन्यातील (Standard Format) अधिकृत फोटो ओळखपत्र.
गॅझेट नोटिफिकेशन (Gazette Notification): नाव बदलल्याचे सरकारी राजपत्रातील प्रसिद्धीपत्रक.
• पतीचे पासपोर्ट/आधार कार्ड : पत्ता बदलण्यासाठी याचा वापर होऊ शकतो (सोबतीला लग्नाचा पुरावा आवश्यक).
ऑफलाईन पद्धत
जर ऑनलाईन शक्य नसेल, तर जवळच्या आधार सेवा केंद्रावर जाऊन मूळ कागदपत्रे दाखवून तुम्ही बायोमेट्रिक पडताळणीद्वारे नाव बदलू शकता.
आधार-पॅन लिंकिंग
तुमचा पॅन कार्ड आधारशी लिंक असणे आता अनिवार्य आहे. तसे न केल्यास पॅन कार्ड निकामी होऊ शकते आणि बँक व्यवहारात अडचणी येऊ शकतात.
पत्ता बदलण्यासाठी सोपी पद्धत
तुमच्याकडे स्वतःच्या नावाचा पत्त्याचा पुरावा नसेल, तर तुम्ही ‘Address Validation Letter’ किंवा कटंबातील प्रमखाच्या (HOF) संमतीने पत्ता बदल शकता.