Home आपला जिल्हा Breaking News नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोनअंतर्गत ३२ गावांची निवड-तालुका कृषी अधिकारी...

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोनअंतर्गत ३२ गावांची निवड-तालुका कृषी अधिकारी सुनील कारडवार

240

मजगीच्या कामासाठी ३२ गावांची निवड
मूल, ता. १४ : नानाजी देशमूख कृषी संजीवनी अंतर्गत कृषी प्रकल्प टप्पा- दोनमध्ये मूल तालुक्यातील ३२ गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये मजगीचे कामे होणार आहे. यासाठी वर्ल्ड बँक निधी देणार आहे. येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातंर्गत आराखडा आणि अंदाजपत्रक तयार करण्यात येत आहे. यातून शेकडो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. निवड करण्यात आलेल्या ३२ गावांमध्ये गरजेनुसार शेतबांध्यावर माती टाकणे, नाला खोलीकरण, सिमेंट बंधारा बांधणे, भात खाचरे तयार करणे, शेततळे निर्माण करणे, गॅबियन बंधारा बांधणे, सिमेंट नाल्याचे बांधकाम करणे असे विविध मृदा व जल संधारणाची कामे यातून केली जाणार आहे.
या
योजनेतंर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येणार आहे. त्यात सिंचनाची सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यात इलेक्ट्रीक पंप, डिझेल इंजिन, पाईप, ठिबक सिंचन, तुषार संच, वैयक्तिक शेततळे, सामूहिक शेततळयांचा लाभ देण्यात येणार आहे. बचतगट, महिला बचतगटाच्या माध्यमातून अवजार बँकही तयार केली जाणार आहे. शेतीपूरक जोडधंद्याला प्राधान्य दिल्या जाणार आहे. शेळीपालन आणि रेशीम उदयोग याला यातून प्राधान्य राहणार आहे. लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना चाळीस लाख रुपयांपर्यंत साहित्य खरेदी करता येणार आहे. त्यासाठी या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ६० टक्के अनुदान मिळणार आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोनअंतर्गत ३२ गावांची निवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी ही योजना उपयुक्त आहे. यात मजगीचे कामे होणार आहे. यासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात येत आहे. ते मंजुरीसाठी वरिष्ठांकडे पाठविले जाईल. त्यांनतर मे महिन्यात कामे सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सुनील कारडवार यांनी दिली.