Home आपला जिल्हा Breaking News मूल शहरात गॅस सिलिंडरसाठी आज भर उन्हात नागरिकांच्या रांगा@ओटीपीचा तिढा, घरात चुलीचे...

मूल शहरात गॅस सिलिंडरसाठी आज भर उन्हात नागरिकांच्या रांगा@ओटीपीचा तिढा, घरात चुलीचे ठाण

392

मूल शहरात घरगुती गॅस सिलिंडर वितरणासाठी आता १०० टक्के ‘ओटीपी’ सक्तीचा करण्यात आला आहे. मात्र, या नव्या नियमामुळे आणि होम डिलिव्हरीमध्ये होणाऱ्या विलंबामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होत असून, नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याने अनेक कुटुंबांवर गेल्या १५ ते २० दिवसांपासून चूल पेटविण्याची वेळ आली आहे.
समोर दुपारी १२ वाजेच्या रणरणत्या उन्हात गॅससाठी नागरिकांनी मोठी रांग लावली होती. आज बूधवार आठवड्याच्या तिसरा—या दिवशी शहरातील विविध मूल शहरात हे विदारक चित्र पाहायला मिळाले. या रांगेत महिला आणि पुरुषांसह लहान मुलांचाही समावेश होता. ज्या ग्राहकांनी अगोदरच गॅसचे ऑनलाइन बुकिंग केले होते, त्यांना रांगेत न उभे राहता थेट सिलिंडर मिळत होता. मात्र, इतरांना तासंतास ताटकळत उभे राहावे लागत होते.
आपली व्यथा मांडताना ते म्हणाले, गेल्या १५ दिवसांपासून गॅस मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे सध्या आमच्या घरी चुलीवर स्वयंपाक सुरू असून, सिलिंडर मिळविण्यासाठी माझी धडपड सुरू आहे.

गॅस सिलेंडर च्या तुडवड्यामध्ये सामान्य नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसत आहे परंतु छोटे मोठे नेते प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, उद्योजक हे कधी गॅस सिलेंडर च्या रांगेत उभे दिसत नाहीत. मग यांना काय घरपोच सेवा उपलब्ध आहे की काय? सामान्य माणसाला उन्हामध्ये रांगेत उभे ठेवायचे आणि प्रतिष्ठित व्यक्तींना सिलेंडर घर पोच मिळत का हा प्रश्न उपस्थित होत आहे.

30 तारखे पासून चूल पेटवतो महोदय.
मागील दोन तीन दिवस सिलेंडर ची समश्या घेऊन ग्रुपवर लिहिलो. सोल्युशन मिळेना, मदतीला कोणी धावेना. मटलं चला आपणच आपली शेकवून घ्यावं. सद्या शेकवणीच चालू आहे. 🙏

ज्याची शेकते, त्यालाच कडते.🙏
काहींकडे चार चार च आप्शन घरी पडून आहे असे ऐकीवात आहे. माहित नाही यातील सत्य. 🙏

ज्याचं पोट भरून ढेकर देण चालू आहे!तेच लोकं दुसर्यांना संयम ठेवा असं सांगतात. 😃😃😃
काही लोकं एजन्सी वाल्याची बाजू घेताना दिसतात. He न उलगडणारे कोडे आहे.