वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यावश्यक असलेल्या नीट २०२६ परीक्षेसाठी ८ फेब्रुवारी २०२६ पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ८ मार्च २०२६ पर्यंत आहे. अर्ज करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी आपला आधार क्रमांक अद्ययावत (अपडेट) करून ठेवणे आवश्यक असल्याचे केंद्र सरकारच्या राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नीट (NEET-UG) 2026 साठीचे ऑनलाइन अर्ज नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या या अधिकृत वेबसाइटवर सुरू झाले आहेत। उमेदवारांनी नवीन नोंदणी (New Registration) करून फॉर्म भरणे आवश्यक आहे, ज्यासाठी १०वीचे प्रमाणपत्र, फोटो, सही आणि अंगठ्याचे निशाण (Thumb Impression) तयार ठेवावे। अर्ज करण्याची अंतिम तारीख व परीक्षेची सविस्तर माहिती वेबसाइटवर उपलब्ध आहे।
बारावी विज्ञान
शाखेनंतर
एमबीबीएस, बीएएमएस, बीव्हीएससी, बीडीएस, बीएचएमएस, बीपीटीएच, बीयूएमएस, ऑप्थॅल्मोलॉजी संबंधित पदवी अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्रासह इतर राज्ये किंवा देशात प्रवेश घ्यायचा असल्यास ही परीक्षा आवश्यक आहे. यंदाची परीक्षा ३ मे २०२६ रोजी ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. २८ ते ३० एप्रिलदरम्यान प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध होईल. निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार आहे.
जिल्ह्यासह विदर्भातील विद्यार्थी व पालकांसाठी नीट परीक्षा फॉर्म भरण्याबाबत कल्पतरू संस्थातर्फे निःशुल्क मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच निकालानंतर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेबाबत शंका असल्यास संस्थेने म्हटले आहे.
अर्ज भरताना काही चुका
झाल्यास विद्यार्थ्यांना १० ते १२ मार्चदरम्यान दुरुस्तीची संधी उपलब्ध राहणार आहे.






