Home आपला जिल्हा Breaking News चांगल्या दर्जाची रेती उपलब्ध करून द्या, अन्यथा घरकुल लाभार्थ्यांना घेऊन तीव्र आंदोलनाचा...

चांगल्या दर्जाची रेती उपलब्ध करून द्या, अन्यथा घरकुल लाभार्थ्यांना घेऊन तीव्र आंदोलनाचा इशारा- सरपंच केमेकार

48

मुल : तालुक्यातील मौजा बेंबाळ येथे रेती व्यवसायीकांकडून घरकुल लाभार्थ्यांची निकृष्ट दर्जाची रेती देऊन फसवणूक करण्यात येत आहे. असा आरोप बेंबाळचे सरपंच चांगले केमेकार यांनी केला आहे.धोरणानुसारशासनाच्याघरकुललाभार्थ्यांना मोफत रेती वाटप करायची असून सदर गावाला मागील वर्षी दिलेला निकृष्ट दर्जा असलेला रेती घाट यावर्षीही तोच घाट दिलेला आहे. रेती व्यवसायिक चांगल्या दर्जाची रेती चोरीच्या मार्गाने विकत असून निकृष्ट दर्जाची रेती घरकुल लाभार्थ्यांना वाटप करत आहेत. हा सारासार घरकुल लाभार्थ्यांवर अन्याय असून तात्काळ उच्च दर्जाची रेती उपलब्ध करून द्यावी अन्यथा गावातील घरकुल लाभार्थ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा ईशारा बेंबाळ गावचे सरपंच चांगदेव केमेकार यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला असून निवेदनाच्या प्रति जिल्ह्याचे खा. प्रतिभा धानोरकर क्षेत्राचे आ. सुधीर मुनगंटीवार,
जिल्हाधिकारी यांना देऊन याबाबत उचित कारवाई करावी
अशी मागणी एका निवेदनातून केली आहे.