Home आपला जिल्हा Breaking News दुगाळा माल येथील शेतशिवारात सुरू असलेल्या जुगारांवर धाड@ लाख रुपयाचा मुद्देमाल...

दुगाळा माल येथील शेतशिवारात सुरू असलेल्या जुगारांवर धाड@ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त

72

चंद्रपूर : मूल तालूक्यातील मौजा दुगाळा माल येथील शेतशिवारात ताशपत्त्यावर जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन पोलिसांनी धाउ टाकत ७ आरोपींना ताब्यात घेतले. सदर धाडीत ३ लाख ९५ हजार ४७० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यातआला. सदर कारवाई १ फेब्रुवारी रोजी करण्यात आली. दिपक मोतीराम शेंडे (३८) रा. चिमढा ता. मुल,, चंद्रकांत सोमाजी प्रधाने (४९) रा. वार्ड क ०९ सावली ता. सावली, अंकुश जर्मन गणविर (३४) व्यवसाय मजुरी रा. येसगाव ता. मुल, राकेश अमोल गणविर (३६) व्यवसाय मजुरी रा. येजगाव ता. मुल, अमोल अर्जुन शेंडे (४४) व्यवसाय मजुरी रा. भेजगाव ता. मुल, नथ्थु भाउजी चौधरी (५२) व्यवसाय मजुरी रा. गडीसुर्ला ता. मुल, संजय यादव बुरांडे (५१) रा. चिंचाळा ता. मुल अशी आरोपींची नावे आहेत. तर १० आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले.
सदर आरोपीविरुध्द कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन फरार
आरोपी किशोर भुरसे रा. उथळपेठ ता. मुल, विजय पाल रा. चेक फुटाणा, जितेद्र चुधरी रा. घोसरी, अमोल गोलावार रा. बाबराळा, अमर टेकाम रा. चिरोली, सौरभ गिरडकर रा. मुल, सुनिल ढोले रा. सावली, सुधीर दुधबळे रा. चिचाळा, मोटारसायकल क्र एम. एच. ३४सीएस००९६ सह पळुन गेलेला चालक, (१७) मिळुन आलेली मोटार सायकल क्रमांक एम. एच. ३४ बीजे ९४३९ चालक या आरोपीचा शोध मुल पोलीस घेत तपास करीत आहे. सदरची कामगिरी मुम्मका सुदर्शन – पोलीस अधीक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे – अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर आणि सत्यजित आमले, उपविभागीय पोलीस अधिकारी मुल यांचे मार्गदर्शनाखाली
पोलीसनिरीक्षक विजय राठोड यांचेनेतृत्वात सपोनि सुबोध वंजारी,पोउपनि रूपेश कुंभरे, पोहवा भोजराज मुंडरे, ब न २३९७, पोहवा अनिल शेडमाके, बन १७३५, नापोअं चिमाजी देवकते, ब न २४९७, पोअं दिलीप आदे, ब न २७१०, पोअ. वेदनाथ करंबेब. न. ५८५ सर्व पोस्टे मुल यांनी केली आहे.