Home आपला जिल्हा Breaking News मुल येथे स्व. मा.सां. कन्नमवार यांच्या जयंती निमित्य राज्यस्तरीय अंतर महाविद्यालयीन वाद-विवाद...

मुल येथे स्व. मा.सां. कन्नमवार यांच्या जयंती निमित्य राज्यस्तरीय अंतर महाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धा

46

कर्मवीर महाविद्यालय मुल येथे स्व. मा.सां. कन्नमवार यांच्या जयंती निमित्य राज्यस्तरीय अंतर महाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धा
मूल : शिक्षण प्रसारक मंडळमूल द्वारा संचालित व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, संलग्नित मूल येथील कर्मवीर महाविद्यालय येथे ‘कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे माणसाची विचार करण्याची क्षमता खुंटत आहे’ या विषयावर राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा संपन्न झाली.
स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ मूलचे अध्यक्ष अॅड. अनिल वैरागडे उपस्थित होते. या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन मूल नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित
अध्यक्ष माननीय एकता प्रशांत समर्थ उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या आयोजक
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता वाळके यांनी मांडले. त्यात त्यांनी राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा आयोजनाचा उद्देश, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा उद्देश महाविद्यालयांनी हाती घेतलेले विविध उपक्रम यांची सखोल अशी माहिती दिली. तदनंतर कार्यक्रमाच्या उदघाटक मा. ऐकता प्रशांत समर्थ यांनी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव व राज्य स्तरीय वादविवाद स्पर्धेचे उद्घाटन
केले. मूल नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रशांत समर्थ यांनी पण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, सोबतच नगर परिषद मूल महाविद्यालयाच्या विकासासाठी सोबत राहील असे आर्श्वासित केले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थेचे सचिव शशिकांत धर्माधिकार, संस्थेचे संचालक डॉ. राममोहन बोकारे उपस्थित होते. राज्य स्तरीय वादविवाद स्पर्धा स्व. मारोतराव
कन्नमवार (माजी मुख्यमंत्री) यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधुन दरवर्षी १० जानेवारी रोजी आयोजीत केली जाते. या स्पर्धेसाठी विविध महाविद्यालयातून विद्यार्थी उपस्थित झालेले होते. विषयाच्या बाजूने व विरुद्ध बाजूने विद्यार्थ्यांनी आपले मते मांडली, व प्रेक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे माणसाची विचार करण्याची क्षमता खुंटत आहे का नाही यावर विचार करण्यासाठी भाग पाडले. सर्वच स्पर्धक विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण विषयाची मांडणी केली. या स्पर्धेतील विषयाच्या बाजूने आपले विचार मांडणारा विद्यार्थी प्रेम नामदेव जरपतवार (गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, पदव्युत्तर विभाग) याने प्रथम क्रमांक पटकाविला व द्वितीय क्रमांक आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा येथील विद्यार्थी
मयूर गंगाधर हनवते यांनी मिळवला. विषयाच्या विरुद्ध बाजूने आयोजक महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. सिद्धी माधव अलोणी हिने प्रथम क्रमांक पटकाविला तर शांताराम विधी महाविद्यालय चंद्रपूर येथील हर्षल दिलीप साळवे यांनी दुसरा क्रमांक पटकाविला. गुनानुक्रमे शांताराम विधी महाविद्यालय चंद्रपूर या महाविद्यालयाने सांघिक पारितोषिक मिळवले. या राज्यस्तरीय परीक्षेचे परीक्षण डॉ. गोकुळ कामडी सर, मा. संजय कुंटावार सर आणि मा. कुनघाडकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. जी एस आगलावे व आभार प्रा. सागर मासीरकर यांनी मांडले. ही स्पर्धा यशस्वीतेसाठी
महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.