Home आपला जिल्हा Breaking News आजपासून इंजिनीअरिंग, कृषी, फार्मसी, एमबीएची सीईटी नोंदणी

आजपासून इंजिनीअरिंग, कृषी, फार्मसी, एमबीएची सीईटी नोंदणी

45

मुंबई : इंजिनीअरिंग, टेक्नॉलॉजी, फार्मसी, बी. प्लॅनिंग, एम. प्लॅनिंग (इंटिग्रेटेड) आणि कृषी या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीच्या प्रवेश परीक्षेच्या नोंदणीला आज, १० जानेवारीपासून सुरुवात होत आहे. एमएचटी सीईटी पीसीएम आणि पीसीबी समूह, तसेच मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन / मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एमबीए, एमएमएस) या प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १२ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे.
अभ्यासक्रमाच्या
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या प्रवेश परीक्षांच्या नोंदणीला सुरुवात केली आहे. राष्ट्रीय स्तरावर जेईईच्या (मेन) दोन प्रवेश परीक्षा होतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना दोनदा
संधी उपलब्ध होते. तशाच दोन संधी
महाराष्ट्रातील
मुलांनाही मिळाव्यात, म्हणून या वर्षापासून सीईटी कक्षाने एमएचटी सीईटी आणि एमबीए / एमएमएस या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा दोन वेळेस घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्याला एक प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक असून, दुसरी प्रवेश परीक्षा ऐच्छिक असेल. यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज करताना आताच दोन प्रवेश परीक्षा द्यायच्या आहेत की एक प्रवेश परीक्षा द्यायची हे ठरवावे लागेल.