Home आपला जिल्हा Breaking News ग्रामपंचायत मारोडा येथे शुक्रवारला 9जानेवारीला आधार शिबीराचा,महसूल विभागातील प्रमाणपत्र चा लाभ घ्यावा—प्रमोद...

ग्रामपंचायत मारोडा येथे शुक्रवारला 9जानेवारीला आधार शिबीराचा,महसूल विभागातील प्रमाणपत्र चा लाभ घ्यावा—प्रमोद मशाखेत्री संचालक

54

गरज लागल्यानंतर धावपळ करण्याऐवजी वेळेतच आपले आधार कार्ड अपडेट करून घेण्याचा सल्ला

मूल :— उद्याला दिनांक 09 जानेवारी 2026 ला सकाळी 10.00 ग्रामपंचायत मारोडा येथे आधार शिबीराचा आयोजन करण्यात आले आहे.या शिबिराचा मारोडा परीसरातील नागरीकांनी आधार शिबाराचा जास्तीत जास्त व्यक्तीनी लाभ घ्यावा.असे आवाहन प्रमोद मशाखेत्री आधार संचालक व सेतू केंन्द्र संचालक मूल यांनी केले आहे.

नागरिकांसाठी आधार कार्ड हे देशांतर्गत ओळखपत्र बनले आहे. शाळेत प्रवेश घेण्यापासून ते निवृत्तीपर्यंतच्या प्रत्येक कामासाठी आधार कार्ड आवश्यक असते. गरज लागल्यानंतर आयत्यावेळी धावपळ करण्याऐवजी वेळेतच आपले आधार कार्ड अपडेट करून घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
ज्या नागरिकांना आधार कार्ड काढून दहा वर्षे होऊन गेली आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची सूचना आहे. भारत सरकारकडून अशा नागरिकांना आपल्याबाबतची सर्व माहिती पुन्हा एकदा देण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

आधार कार्ड हा ओळख आणि पत्ता, या दोन्ही गोष्टींचा पुरावा मानला जातो. मात्र ज्यांना आधार कार्ड काढून दहा वर्षे होऊन गेली आहेत, त्यांचा पत्ता बदललेला असण्याची शक्यता असते. त्यामुळेच नागरिकांनी आपला पत्ता आणि आपली ओळख याबाबतचे तपशील पुन्हा एकदा सादर करून, आपले आधार कार्ड अपडेट करून घ्यावे, असे आवाहन सरकारने केले आहे.
ज्यांना आधार कार्ड काढून दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे आणि गेल्या दहा वर्षात त्यांनी आपली माहिती अपडेट केलेली नाही. जर गेल्या दहा वर्षात तुम्ही माहिती अपडेट केली असेल तर तुम्हाला पुन्हा अपडेट करण्याची गरज नाही, असेही सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आला आहे.

आधार कार्डमधील काही माहिती अपडेट करण्यासाठी आधार शिबारावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण केल्यास तुम्हाला कमीत कमी शुल्क द्यावे लागेल.UIDAI ने 10 वर्षांपेक्षा अधिक जुन्या आधार कार्ड धारकांना त्यांची माहिती अपडेट करण्याचे आवाहन केले आहे.
नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता आणि भाषा बदलवू शकता, त्यात बदल करु शकता. दुरुस्तीसाठी, सुधारणेसाठी तुमचा दहा अंकी मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक करून मिळेल

जन्मतारीख अपडेट करण्यासाठी जन्मप्रमाणपत्राची स्कॅन कॉपीची गरज पडते
भारतात आधार कार्ड (Aadhar Card) हे एक अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. आजकाल प्रत्येक सरकारी कामासाठी ओळखपत्र (Identity Card) म्हणून आधार कार्डची गरज भासत असते. कुठल्याही छोट्यामोठ्या सवलतीपासून ते बँकेत खातं उघडण्यापर्यंत आणि ड्रायव्हिंग लायसन्सपासून ते घर खरेदीपर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड मागितले जाते. आपल्या पत्त्याचे आणि ओळखीचे इतरही अनेक पुरावे असले, तरी सध्या भारतातील अनेक योजना या आधार कार्डशी निगडित आहेत. त्यामुळे प्रत्येकाकडे आधार कार्ड असावे, यासाठी भारत सरकार प्रयत्नशील असते. अधिकाधिक नागरिकांनी आधार कार्ड काढावे, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असतात. आता ज्यांना आधार कार्ड काढून दहापेक्षा जास्त वर्षे झाली आहेत,त्यांच्यासाठी सरकारने एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. आपली ओळख आणि पत्ता यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी नव्याने पुरावे देण्याची सूचना सरकारने केली आहे.

आधार क्रमांकासाठी ओळखपत्र (POI) आणि पत्त्याचा पुरावा (POA) अपडेट करण्यासाठी तुम्ही myaadhaar पोर्टल वरून ऑनलाइन किंवा कोणत्याही आधार केंद्रावर जाऊन हे काम करू शकता; यासाठी तुम्हाला पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, बँक पासबुक किंवा वीज/पाणी/टेलिफोन बिल यांसारखी वैध कागदपत्रे आवश्यक आहेत आणि UIDAI दर १० वर्षांनी ही कागदपत्रे अपडेट करण्याची शिफारस करते, ज्यामुळे तुमची माहिती अचूक राहते.
ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे अपडेट करण्याची प्रक्रिया (myaadhaar पोर्टल)
पोर्टलला भेट द्या: UIDAI च्या myaadhaar पोर्टलला भेट द्या.
लॉगिन करा: तुमचा आधार क्रमांक आणि OTP वापरून लॉगिन करा.
दस्तऐवज अपडेट निवडा: ‘Update your Aadhaar’ विभागात ‘Document Update’ पर्याय निवडा.
POI आणि POA अपलोड करा: तुमचा ओळखपत्र (Proof of Identity – POI) आणि पत्त्याचा पुरावा (Proof of Address – POA) यांची स्कॅन केलेली रंगीत आणि स्पष्ट कागदपत्रे (PDF/JPEG फॉरमॅटमध्ये, 2MB पेक्षा कमी) अपलोड करा.
पेमेंट करा: आवश्यक शुल्क (सुमारे ₹50) भरा.
सबमिट करा: अर्ज सबमिट करा आणि रेफरन्स स्लिप डाउनलोड करा.
आधार केंद्रावर जाऊन अपडेट करण्याची प्रक्रिया
जवळचे केंद्र शोधा: ‘Centres Nearby’ किंवा पिन कोड वापरून जवळचे आधार नोंदणी/अपडेट केंद्र शोधा.
कागदपत्रे घेऊन जा: POI आणि POA साठी आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रती घेऊन जा. केंद्रावर त्यांची स्कॅन करून लगेच परत केली जातात.
शुल्क भरा: केंद्रावर शुल्क भरा.
आवश्यक कागदपत्रांची उदाहरणे
POI (ओळखीचा पुरावा): पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारी फोटो आयडी.
POA (पत्त्याचा पुरावा): पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, बँक पासबुक, मागील ३ महिन्यांचे वीज/पाणी/टेलिफोन बिल.
महत्त्वाचे मुद्दे
वारंवारता: UIDAI ची शिफारस आहे की तुम्ही दर १० वर्षांनी कागदपत्रे अपडेट करावीत.
ऑनलाइन शुल्क: ऑनलाइन अपडेट करण्यासाठी शुल्क लागू होते, जे साधारणपणे ₹50 असते.