Home आपला जिल्हा Breaking News ‘गावाकडे प्रशासन’ या मोहिमेचा शुभारंभ सुशासन सप्ताह २०२५

‘गावाकडे प्रशासन’ या मोहिमेचा शुभारंभ सुशासन सप्ताह २०२५

56

केंद्र शासनामार्फत दि.19 ते 24 डिसेंबर 2025 या कालावधीत “सुशासन सप्ताह गांव की और” (Good Governance Week) साजरा करण्यात येत आहे.

आज दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी महसूल विभाग महसूल मंडळ राजगड व चिखली येथे आयोजन करण्यात आले राजगड येथे समन्वय अधिकारी किशोर उइके म.अ. ,अनिल मेकलवार ग्रा.म.अ. गणेश कोळी ग्रा.म. अ. दीपक गोहणे म अधिकारी,महेश पेंदोर ग्रा.म.अ.,पिदुरकर ग्रा.म.अ.आकाश कन्नाके ग्रा.म.अ.सेतू केंन्द्राचे प्रमोद मशाखेत्री,विवेक मुनगेलवार,पराग खोबा्रगडे,स्वेता मंडलवार,तसेच मंडळातील राजगड,चिखली गावातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.

नियंत्रण अधिकारी म्हणून दिनेश पवार नायब तहसिलदार,मूल विजय पंडिले नायब तहसिलदार,मूल उपस्थित होते.तसेच पुरवठा विभागतील पुरवठा निरीक्षक श्रीरभाते,कर्मचारी वृंद तसेच अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

या शिबिरात विविध शासकीय योजनांचे लाभ लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने लाभार्थ्यांची उपस्थिती होती.

तसेच उद्या दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी महसूल मंडळ बेंबाळ व चिरोली येथे आयोजीत करण्यात येणार आहे
व 24 डिसेंबर 2025 रोजी तहसील कार्यालय मूल येथे आयोजन करण्यात करण्यात येणार आहे.

सदरचा सप्ताह तहसिल कार्यालय मूल आयोजित करणेत येणार आहे. तरी या महसूल मंडळांतील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नायब तहसिलदार पवार यांनी केले आहे.

सुशासन सप्ताहांतर्गत प्रशासन गाव की ओर या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन
• सुशासन सप्ताहानिमित्त विविध विभागांनी समन्वयाने विशेष उपक्रम राबविण्याचे तहसीलदार मोरे यांचे निर्देश

सुशासन सप्ताहांतर्गत प्रशासन गाव की ओर या उपक्रमाअंतर्गत तहसील व पंचायत समिती स्तरावर नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करणे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ व सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने दि. 19 ते 25 डिसेंबर 2025 या कालावधीत सुशासन सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

या कालावधीत तहसील मूल यांच्यामार्फत गावपातळीवर समाजाच्या विविध घटकांतील नागरिकांसाठी विशेष मोहिमा, कार्यक्रम, उपक्रम, शिबिरे तसेच महसूल अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. सुशासन सप्ताहातील कार्यक्रमांचे नियोजन करताना संबंधित विभागांशी समन्वय साधून कार्यवाही करावी, असे निर्देश
सुशासन सप्ताहाच्या वेळापत्रकानुसार महसूल अभिलेख नोंदी,
दि. 22 डिसेंबर रोजी  योजनेच्या अंमलबजावणीसाठी शिबिरे,
तर दि. 23 डिसेंबर रोजी योजना यांच्या अंमलबजावणीसाठी गावपातळीवर शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
दि. 25 डिसेंबर रोजी शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष शिबिरे घेतली जाणार आहेत.

याशिवाय दि. 19 ते 25 डिसेंबर 2025 या कालावधीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत कार्डधारक व नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी गावपातळीवर शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. सुशासन सप्ताहाच्या अनुषंगाने कार्यालयांशी संबंधित प्रलंबित अर्ज व तक्रारींचे निवारण करून नागरिकांची कामे पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.
सुशासन सप्ताह कालावधीत राबविण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमांची फोटोसह माहिती पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक असून, दररोजचा प्रगती अहवाल दिले आहेत. या अहवालात विशेष शिबिरांतर्गत व सीपीजीआरएमएस तसेच राज्य पोर्टलवरील निकाली काढलेल्या सार्वजनिक तक्रारींची संख्या, ऑनलाईन सेवा वितरणाशी जोडलेल्या सेवांची व अर्जांची संख्या, सुशासन पद्धतींचा प्रसार, यशोगाथा व प्रसार कार्यशाळेचा तपशील समाविष्ट करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे