Home आपला जिल्हा Breaking News मोबाईल कडून मैदानाकडे या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेत राधा गुंडोजवार सुयशस्वी

मोबाईल कडून मैदानाकडे या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेत राधा गुंडोजवार सुयशस्वी

57

बालविकास प्राथमिक शाळेची राधा वक्तृत्व स्पर्धेत सुयशस्वी

मूल : पंचायत समिती, मूल तसेच महात्मा फुले विद्यालय,चिरोली येथे नुकत्याच पार पडलेल्या दोन दिवसीय ५३ व्या
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत समाजसुधारक शिक्षण प्रसारक मंडळ, मूल द्वारा संचलित बालविकास प्राथमिक शाळा, मूल येथील राधा आशिष गुंडोजवार इयत्ता सातवी या विद्यार्थिनीने मोबाईल कडून मैदानाकडे या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून शाळेला सुयश प्राप्त करून दिले.
आपल्या यशाचे श्रेय तिने शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता अनिल बुटे यांना तसेच विज्ञानशिक्षक सचिनबल्लावार यांना दिले. तिच्यायशाबद्दल संस्थेचे सचिव अनिलबुटे तसेच शाळेतील कार्यरत शिक्षकांनी अभिनंदन केले.