Home आपला जिल्हा Breaking News मूल येथील रिया कामडे कुस्तीत बोलबाला पुप्पगुच्छ देवून स्वागत…..

मूल येथील रिया कामडे कुस्तीत बोलबाला पुप्पगुच्छ देवून स्वागत…..

95

कुस्ती हा खेळ पुरुषांचा समजला जाणारा असला तरी मूल शहरातील महिला कुस्तीगीर पै. रिया अजय कामडे हिने उत्कृष्ट कामगिरी करत ६२ किलो वजन गटात कास्य पदक पटकावलं आहे. कुस्ती क्षेत्रात आपली हुकुमतगाजवली आहे. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत तिने ‘गोल्डन’ कामगिरी करून आपले वर्चस्व राखून चंद्रपूर जिल्हयातून मूल तालुक्यात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. . आमिर खानचा ‘दंगल’ चित्रपट गेल्या 4 वर्षीत प्रदर्शित झाला होता. त्यात महिला कुस्तीपटूच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला होता. यानंतर महिला कुस्तीपटूंबाबत जनसामान्यांत चर्चा सुरू झाली; मात्र असे असले तरी मूल शहरातील महिला कुस्तीगीर पै. रिया अजय कामडे युवा कुस्तीपटू कुस्ती क्षेत्रात आपल्या कामगिरीने राज्य स्तरावर अनेकांचे लक्ष वेधून घेत होती.
विशेष म्हणजे महिला खेळाडू पुढे येत असल्या मुलींना कुस्ती क्षेत्रात पाठविणे हे प्रवाहाविरुद्ध जाण्यासारखे काम आहे; मात्र कामडे कुटुंबियांनी याची परवा न करताना कुस्तीत आपला ठसा उमटवणा°या रिया ला पाठिंबा दिला. अशा परिस्थितीत रिया कामडे हिने मिळविलेले यश वाखणण्याजोगे आहे.मूल शहरातील वार्डातील नागरीकांना पुप्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.कोरडे साहेब तसेच,गोगूल यांनी तसेच परीवारातील नागरीकांनी पुप्पगृच्छाचा घरी येताना स्वागत करण्यात आले.
महिला कुस्ती क्षेत्रात मूल शहराचा पहिला मान – पै. रिया कामडेचं कास्यपदक जिंकून यशस्वी दमदार प्रदर्शनयुवक व सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत ओरोस (जि. सिंधुदुर्ग) येथे सुरू असलेल्या १४ वर्षाखालील मुला-मुलींच्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत मूल शहरातील महिला कुस्तीगीर पै. रिया अजय कामडे हिने उत्कृष्ट कामगिरी करत ६२ किलो वजन गटात कास्य पदक पटकावलं आहे.
प्रशिक्षक पै. आकाश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मागील काही वर्षांपासून मूल शहरात नव्याने सुरू झालेल्या कुस्ती प्रशिक्षण केंद्रातून या तरुण खेळाडूने मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केलं. विशेष म्हणजे, मूल शहराला महिला कुस्तीच्या खेळात मिळालेलं हे पहिलं पदक असून, या यशाने शहराचं नाव अभिमानाने उंचावलं आहे. पै. रिया कामडे हिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्रीडा क्षेत्रातून आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या पुढील वाटचालीस सर्व स्तरांतून हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.