Home आपला जिल्हा Breaking News मुलांसाठी गुड न्यूज@आता शाळेतच होणार आधारशी निगडीत ‘हे’ काम, MBU शिबीराचे आयोजन

मुलांसाठी गुड न्यूज@आता शाळेतच होणार आधारशी निगडीत ‘हे’ काम, MBU शिबीराचे आयोजन

80

MBU प्रलंबित असलेल्या शाळांकरिता शाळेत आधार MBU शिबीराचे आयोजन

मूल तालुक्यातील,शहरातील अधिक मुलांनी वयाची पाच वर्षे पूर्ण केल्यानंतरही अद्याप आधारमध्ये आवश्यक बायोमेट्रिक अपडेट केलेलं नसल्याची माहिती समोर आलीये. अशा मुलांसाठी, आधार जारी करणारी संस्था, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आता मूल तालुकयातील शाळांमधून मुलांचे बायोमेट्रिक अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

मूल शहरातील माउुन्ट कॉन्वेट येथे कालपासून ते आजपर्यंत तसेच नवभारत विद्यालय मूल येथील विद्यार्थी आधार अपडेट करतांना…

मूल तालुक्यातील शाळा व महाविदयालयातील विद्यार्थ्यांचे MBU (Mandatory Biometric Update) शिबीर RO-MUM-4/1-1/2025/ E & U/MBU/Mah/School/1725 Dated 10.10.2025.

मूल तालुक्यातील ब-याच शाळांमध्ये 5 ते 17 वयोगटातील मुलांचे आधार MBU (Mandatory Biometric Update) अद्ययावत करण्याच्या सुचना प्राप्त झाल्या आहेत. त्याअनुषंगाने जास्त MBU प्रलंबित असलेल्या शाळांकरिता शाळेत आधार MBU शिबीराचे आयोजन
शाळाच बनणार आधार अपडेट केंद्र
शाळेच्या आवारात मुलांचे बायोमेट्रिक अपडेट केले जाईल. नियमांनुसार ५ ते 1७ वर्षे वयोगटातील बायोमेट्रिक अपडेट मोफत आहे, परंतु 18 वर्षांनंतर यासाठी १25 रुपये मोजावे लागतील. ते वेळेत अपडेट न केल्यास आधार क्रमांकही डिअॅक्टिव्हेट होऊ शकतो.
शाळा प्रवेश व इतर लाभांसाठी आवश्यक
बायोमेट्रिक अपडेट झाल्यानंतर आधार कार्डचा वापर शाळेचा प्रवेश, शिष्यवृत्ती, सरकारी योजना आणि परीक्षा नोंदणी सारख्या सेवांसाठी केला जाऊ शकतो. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) शाळा आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून वयाची 17 वर्षे पूर्ण झाल्यावर म्हणजेच एमबीयू झाल्यानंतर ही सुविधा दुसऱ्या अनिवार्य बायोमेट्रिक अपडेटपर्यंत वाढवण्याचा विचार करीत आहे.
या प्रकल्पांतर्गत प्राधिकरण चंद्रपूर जिल्ह्यात मूल तालुक्यातील बायोमेट्रिक मशिन असून, ती रोटेशन तत्त्वावर विविध शाळांमध्ये पाठविण्यात येणार आहे, जेणेकरून अधिकाधिक मुलांना या सुविधेचा लाभ घेता येईल. शासनाच्या योजनांचा संपूर्ण लाभ सर्व मुलांना वेळेत मिळावा आणि त्यांच्या ओळखीशी संबंधित प्रक्रिया सुलभ व सुलभ व्हावी, हा प्राधिकरणाचा उद्देश आहे.