Home आपला जिल्हा Breaking News प्रभाग क्रमांक आठ च्या जनतेसोबत सदैव सोबत राहणार- महिला उमेदवार सौ.टिना राजेश...

प्रभाग क्रमांक आठ च्या जनतेसोबत सदैव सोबत राहणार- महिला उमेदवार सौ.टिना राजेश ठाकरे

97

मूल शहराच्या प्रभाग क्र 08 मध्ये शिवसेना उबाठा उमेदवार म्हणूनसौ. टिना राजेश ठाकरे निवडणूक लढवित आहेत. प्रभागाच्या विकासाकरिताअविरत प्रयत्न आणि सामाजिक कार्यातील त्यांची भूमिका महत्वपूर्ण आहे.धैर्य व चिकाटी असेल तर विकास झाल्याशिवाय राहणार नाही.हीच भूमिका सौ. टिना राजेश ठाकरे यांची आहे. पती राजेश ठाकरे यांनी प्रभागाच्याविकासासाठी त्यांनी केलेली धडपड उल्लेखनीय आहे. प्रसंगी स्वखर्चाने जनतेला न्याय मिळवून देण्याची त्यांची भूमिका आहे.त्यांच्या या कार्याला पूढे नेण्याचे सौ. टिना राजेश ठाकरे यांनी ठरविले असून त्यांची
स्वच्छ प्रतिमा आणि नेतृत्व तसेच सामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण म्हणून त्यांचे नेतृत्व
प्रभाग क्रमांक08मध्ये विशेष ओळख निर्माण करीत आहे.
जनतेला योजनेची माहिती देण्याकरिता त्यांनी केलेले प्रयत्न वाखाणनीय आहे. प्रभागातील परिसरामध्ये वृक्ष लागवड करून परिसर सुशोभित करण्याकरिता शासकीय योजनांचा अवलंब करण्यासाठीत्या प्रयत्नशील राहतील असे त्यांनी सांगितले.अशा साक्षम उमेदवाराला तिकीट दिल्याने मतदारांमध्ये नवचैतन्य पसरले असून सौ. टिना राजेश ठाकरेया उमेदवारांना जनता निवडून देईल,अशी अपेक्षा त्यांना आहे.