महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता ५वी (पूर्व उच्च प्राथमिक) आणि इयत्ता ८वी (पूर्व माध्यमिक) शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत महत्त्वाचा बदल केला आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये होणारी ही परीक्षा आता लांबणीवर पडली असून, ती २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेतली जाणार आहे.
वेळापत्रकानुसार,
नियोजित राज्यभरात शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणार होती. मात्र, त्याच दिवशी केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डातर्फे ‘केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा’ (सीटीईटी) आयोजित करण्यात आली आहे.
राज्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शिक्षक या (सीटीईटी) परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत. एकाच दिवशी दोन्ही परीक्षा आल्यामुळे शिक्षकांची अडचण होऊ नये आणि त्यांना (सीटीईटी) परीक्षा देता यावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या तांत्रिक अडचणींमुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलली आहे. आता इयत्ता ५ वी आणि ८ वीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारीऐवजी रविवारी, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडेल. या बदलाची सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शाळांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे. आता २२ फेब्रुवारीला होणाऱ्या शिष्यवृत्तीच्या परिक्षेकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे.
Home आपला जिल्हा Breaking News शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर@’या’ तारखेला होणार पेपर एकाच दिवशी आल्या होत्या दोन्ही परिक्षा






