Home आपला जिल्हा Breaking News मूल महसूल प्रशासनाचे आवाहन@’शेतपिक नुकसान’ बाबत शेतकऱ्यांना…….

मूल महसूल प्रशासनाचे आवाहन@’शेतपिक नुकसान’ बाबत शेतकऱ्यांना…….

77

मूल : माहे जून २०२५ पासून पावसाळा हा मानसुन कालावधी सुरु झालेला असून या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमध्ये अवेळी पाऊस, अतिवृष्टी व पुरपरिस्थीतीमुळे शेतपिकांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये भविष्यात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाल्यास शेतपिक नुकसान अनुदाना करीता नुकसानग्रस्त खातेदार याचे फार्मर आयडी, शेतकरी ओळख क्रमांक, आधार क्रमांक, बँक खात्याचे नाव, बँक खाते क्रमाक, बँक आयएफएससी कोड व मोबाईल नबंर असणे आवश्यक आहे अन्यथा भविष्यात शेतपिक नुकसान अनुदानपासून वचिंत रहावे लागेल.

माहे २९ व ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झालेले आहे. नुकसान झालेल्या शेतपिकाचे ग्राम महसुल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी या त्रिस्तरीय समिती याच्यामार्फत गावनिहाय सयुंक्त पंचनामे करण्यात आलेले आहेत. सयुक्त पचंनाम सर्व्हे करताना कोणताही नुकसान ग्रस्त शेतकरी शेतपिक अनुदानापासुन वंचित राहणार याकरीता प्रत्येक गावात मुनादी, दवंडी, प्रसिध्दी अहवाल, चावडी वाचन करुन नुकसानग्रस्त खातेदाराच्या यादया ग्रामपंचायतला प्रसिध्द करण्यात आलेले आहे. प्रत्येक गावनिहाय ग्रामपंचायतमध्ये नुकसानग्रस्त खातेदाराच्या यादया प्रसिध्द करण्यात आलेल्या आहे. त्या गावातील काही नुकसानग्रस्त खातेदार यांनी अद्यापही आपले फार्मर आयडी, शेतकरी ओळख क्रमांक, आधार क्रमांक, बँक खात्याचे नाव, बँक खाते क्रमाक, बँक आयएफएससी कोड व मोबाईल नबंर सादर केलेले नाही. करीता गावातील सर्व शेतकऱ्याना आवाहन करण्यात यावे की, आपल्या गावातील सबंधित ग्राम महसुल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी याच्यांशी सपंर्क साधुन आपल्याकडील फार्मर आयडी, शेतकरी ओळख क्रमांक, आधार क्रमांक, बँक खात्याचे नाव, बँक खाते क्रमाक, बँक आयएफ एससी कोड व मोबाईल नबंर दोन दिवसात जमा करण्यात यावे. तसेच ज्या नुकसानग्रस्त खातेदाच्या ७/१२ वर एका पेक्षा अधिक नावे आहेत असे सामाईक खातेदार यांनी शेतपिक नुकसान अनुदान करीता दोन दिवसात लेखी विहीत नमुन्यात संमती देण्यात यावी. तसेच जास्तीत जास्त शेतकरी यांनी आपल्या गावातील नागरी सुविधा केंद्र येथुन ७/१२ ला आधार लिंक नोदंणी करुन शेतकरी फार्मर आयडी, शेतकरी ओळख क्रमांक अॅग्रिस्टॅक नोदंणी करुन घ्यावी. ग्रामपंचायतमध्ये प्रसिध्दीकरण्यात आलेल्या यादीतील नुकसानग्रस्त शेतकरी व नागरीकांना आवाहन करण्यात येते आहे यांनी वरील सर्व कागदपत्रे दोन दिवसात ग्राम महसुल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी याच्याकडे जमा न केल्यास शेतपिक नुकसान अनुदानपासुन वचिंत रहावे लागेल. शेतपिक नूकसान अनुदान न मिळाल्यास आपण सर्वस्वी जबाबदार राहाल याबाबत नोंद घेण्यात यावी. तसेच वरीलप्रमाणे सर्व कागदपत्रे विहीत मुदतीत प्राप्त न झाल्यास शेतपिक नूकसान अनुदान न मिळाल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी असे आवाहन महसूल विभागाने केले आहे. (ता. प्र. )