Home आपला जिल्हा Breaking News ३१डिसेंबरच्या मुदतवाढीसह नवे निकष@वडील, पती हयात नाही? हा आहे तोडगा ….तर ई-केवायसीमधून...

३१डिसेंबरच्या मुदतवाढीसह नवे निकष@वडील, पती हयात नाही? हा आहे तोडगा ….तर ई-केवायसीमधून त्यांना मिळणार सूट

67

संपूर्ण राज्यभरात लाडकीबहीण योजनेत ई-केवायसी करण्यास मुदतवाढ मिळालीआहे. यासोबतच ज्या महिलेचे पती अथवावडील हयात नाही अथवा महिला घटस्फोटित असेल तर अशा महिलांना ई-केवायसीमधून
सुटमिळणार आहे. तसा अध्यादेश महिला व बालविकास विभागाचे सचिव प्र. वि. कुलकर्णी यांनी काढला आहे. त्यानुसार महिलांना आता अंगणवाडी सेविकेकडे तसे पुरावे सादर करावेलागणार आहे.लाडकी बहीण
योजनेत महिलांना ई-केवायसीपूर्णकरण्यासाठी३१डिसेंबरपर्यंतमुदतवाढमिळाली आहे. यासोबतच या योजनेच्या अंमलबजावणीत काहीफेरबदल सुचविण्यात आले आहे. महिलांना ई-केवायसी करताना काही अडचणी येत आहेत. त्या अडचणी सोडविण्यावर उपाययोजना सुचविण्यातआल्या आहेत.या योजनेंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत त्या महिलांनी वडिलांच्या नावाने स्वतःचे आधार कार्ड योजनेसाठी सादर केले आहे अशा महिलांना वडिलांचे आधार कार्ड जोडण्याच्या सूचना आहेत. मात्र, वडीलच हयात नसल्याने ओटीपी येण्यास अडचणी आल्या आहेत. यातून ही प्रक्रिया अडचणीत आली होती. अनेक महिलांनी सादर केलेल्या आधार कार्डमध्ये पतीचे नाव आहे. मात्र, पतीचा मृत्यू झाल्याने पतीचे आधार कार्ड त्यांना सादर करता येत नाही. काही महिलांनी पतीचे नाव आधार कार्डमध्ये टाकले आहेत. या महिला आज घटस्फोटित आहे. अशा महिलांना त्यांच्या पतीचे आधार कार्ड योजनेत दाखल करता आले नाही. यामुळे ई-केवायसीची प्रक्रियाच खोळंबली होती.
अशा आहेत नव्या सूचना
वडील नाही, पती नाही किंवा घटस्फोटित महिला असेल तर अशा महिलांनी ई-केवायसी करायची. त्यानंतर त्याचे पती अथवा वडील यांचे मृत्यूचे अधिकृत प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत ३१ डिसेंबरपर्यंत अंगणवाडी ताईला सादर करावी लागणार आहे. अंगणवाडीताई या प्रमाणपत्राची तपासणी करणार आहे. या महिलांना ई-केवायसी प्रक्रियेतून सूट मिळणार आहे. या महिलांना प्रक्रियेतून सूट देण्यात यावी, अशी शिफारस बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडे करणार आहे. त्यानंतर महिला व बालविकास अधिकारी यांनी आयुक्त महिला व बालविकास विभाग यांच्याकडे शिफारस करावी लागणार आहे. यामुळे अनेक महिलांना दिलासा मिळणार आहे. ३१डिसेंबरच्या मुदतवाढीसह नवे निकष धडकले