Home आपला जिल्हा Breaking News मूल @जोरदार शक्तिप्रदर्शन नगराध्यक्ष 09 तर नगरसेवक पदासाठी 112 नामांकन

मूल @जोरदार शक्तिप्रदर्शन नगराध्यक्ष 09 तर नगरसेवक पदासाठी 112 नामांकन

79

अखेरच्या दिवशी उडाली झुंबड : उमेदवारीसाठी राजकीय पक्षांनी शेवटपर्यंत ठेवला ‘सस्पेन्स’
उमेदवारी कुणाला मिळणार अन् कुणाचा पत्ता कटणार, अशा विविध चर्चानी मूल शहरात राजकीय वातावरण हळूहळू तापत असतानाच सोमवारी (दि. १७) अखेरच्या दिवशी जोरदार शक्तिप्रदर्शन करत 09 नगराध्यक्ष पदांसाठी , तर 112 सदस्य पदांसाठी उमेदवारांनी नामांकन दाखल केले. शक्तीप्रदर्शन मिरवणुकीत सहभागी झाले होते. अर्ज दाखल करताना तहसील कार्यालयांत इच्छुक उमेदवारांसह समर्थकांची मोठी झुंबड उडाल्याचे दिसून आले. बंडखोर टाळण्यासाठी राजकीय पक्षांनी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारीचा सस्पेन्स कायम ठेवला होता. नामांकन अर्जाची एकूण संख्या नगराध्यक्ष 09तर नगरसेवक पदासाठी 112 नामांकन झाली असून, सोमवारी (दि. १८) छाननी होईल.
२५ डिसेंबरपर्यंत माघारीचा दिवस असल्याने धक्कादायक राजकीय घडामोडींना आता वेग येणार आहे.
2 डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती.
मूल नामाप्र (महिला) किरण कापगते, शिवानी भांडरवार, माधुरी करकाळे (भाजप), एकता समर्थ (काँग्रेस), भारती राखडे (शिवसेना- शिंदे), चैताली मंद्रीवार (बसपा), गितांजली तांगडे (अपक्ष)
नगराध्यक्षपदासाठी नामांकन दाखल करणारे उमेदवार
दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी नगरपरिशद निवडणूक 2025 करिता प्राप्त नामनिर्देशनपत्र निरंक
दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी नगरपरिशद निवडणूक 2025 करिता प्राप्त नामनिर्देशनपत्र निरंक
दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नगरपरिशद निवडणूक 2025 करिता प्राप्त नामनिर्देशनपत्र निरंक
दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी नगरपरिशद निवडणूक 2025 करिता प्राप्त नामनिर्देशनपत्र निरंक
दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी नगरपरिशद निवडणूक 2025 करिता प्राप्त नामनिर्देशनपत्र निरंक नगरसेवक …..16
दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी नगरपरिशद निवडणूक 2025 करिता प्राप्त नामनिर्देशनपत्र
नगराध्यक्षपदाकरीता 02 नगरसेवक …35
दिनांक 17 नोव्हेंबर नगराध्यक्ष पदाकरीता 07 नगरसेवक …61