Home आपला जिल्हा Breaking News विभागीय स्तरावरील शालेय कराटे क्रीडा स्पर्धेत मूलच्या तीन खेळाडूंनी मारली बाजी

विभागीय स्तरावरील शालेय कराटे क्रीडा स्पर्धेत मूलच्या तीन खेळाडूंनी मारली बाजी

64

बारामती (पुणे) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेसाठी झाली निवड

मूल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय स्तरावरील शालेय कराटे क्रीडा स्पर्धेचे आयोजन ६ आणि ७ नोव्हेंबर रोजी प्रसन्न सेलिब्रेशन हॉल, गडचिरोली येथे करण्यात आले होते.
या स्पर्धेत नागपूर विभागातील नागपूर ग्रामीण, नागपूर मनपा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि चंद्रपूर मनपा येथील कराटे खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेत चंद्रपूर ग्रामीण तालुक्यातील सेंट अॅन्स हायस्कूल, मूल येथील तीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत विजेतेपद मिळवले. मुलांच्या गटात यश दुर्वास गावंडे याने १४ वर्षे वयोगट व ४५ किलो वजन गटात उत्कृष्ट कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकावला. तर मुलींच्या गटात श्रीजा सूचित सहारे हिने ४२ किलो वजन गटात आणि परी प्रभाकर मांदाडे हिने ५० किलो वजन गटात एकतर्फी विजय मिळवला. या तिन्ही विजेत्या खेळाडूंची निवड २० ते २३ नोव्हेंबर दरम्यान बारामती (पुणे) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेसाठी झाली असून, ते आपल्या वयोगट आणि वजन गटात नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ही मुले मुख्य प्रशिक्षक इम्रान खान आणि प्रशिक्षक निलेश गेडाम यांच्या मार्गद‍ नाखाली कराटे अँड फिटनेस क्लब, मूल येथे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जुंसेई शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया चे राष्ट्रीय प्रमुख विनय बोधे, मूल तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे, कराटे अँड फिटनेस क्लब मूल चे संचालक व मुख्य प्रशिक्षक इम्रान खान, प्रशिक्षक निलेश गेडाम, सेंट अॅन्स हायस्कूलच्या प्राचार्या सिस्टर ग्रेसी थॉमस, क्रीडा शिक्षक आकाश चौधरी तसेच सर्व पालकवर्ग आणि नगरवासीयांनी अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (ता. प्र. )