Home आपला जिल्हा Breaking News कुणाला कोणत्या पक्षाचे तिकीट मिळणार, कुणाचा होणार पत्ता कट ‘गुलदस्त्यात’

कुणाला कोणत्या पक्षाचे तिकीट मिळणार, कुणाचा होणार पत्ता कट ‘गुलदस्त्यात’

108

नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अद्याप आपल्याला ‘तिकीट’ मिळणार की नाही, याच चिंतेत असंख्य उमेदवार आहेत. घरोघरी जाऊन ‘गृहभेट’ कार्यक्रम उरकविला जात आहे. कोणता झेंडा घेऊ हाती, असा प्रश्न असंख्य उमेदवारांसमोर निर्माण झाला आहे.
नेत्यांनी ‘शब्द’ दिला असला तरी एकाच प्रभागातून, एकाच पक्षातून असंख्य चेहरे तिकिटाची मागणी करताना दिसतात. जोपर्यंत उमेदवारी अर्जासोबत पक्षाचा अधिकृत ‘बी’ फॉर्म जोडला जात नाही, तोपर्यंत पक्षाची अधिकृत उमेदवारी पक्की झाल्याचेही शिक्कामोर्तब होत नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख १७ नोव्हेंबर असल्याने त्याच दिवशी कोण, कोणत्या पक्षातून टे चित्र स्पष्ट टोर्टल पक्ष आणि चिन्ह सांगायचे कसे?
नगराध्यक्ष असो वा नगरसेवकपदाच्या उमेदवाराचे एकही नाव कोणत्याही पक्षाने अद्याप जाहीर केलेले नाही. यामुळे सर्वांचीच धाकधूक वाढली आहे. मंगळवारी दिनांक 11/11/2025 रोजी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. यामुळे गृहभेटीतून आलेल्या उमेदवारांना मतदार विविध प्रश्न विचारत आहेत.अशावेळी आपण कोणत्या पक्षातून सांगायचे, चिन्ह कोणते राहील, असा प्रश्न विचारला जात आहे. पक्षाचे तिकीटच मिळाले नाही तर अपक्ष उमेदवारी असेल की नाही आदी प्रश्नांच्या चक्रव्यूहात इच्छुक उमेदवार अडकले आहेत.
कागदपत्रांची जुळवाजुळव
निवडणूक लढण्यासाठी महत्त्वपूर्ण दस्तऐवज उमेदवारांना अर्जासोबत
जोडावी लागतात. सोबतच ऑनलाइन भरलेला फॉर्म, शपथपत्राची प्रत, मतदार यादीत उमेदवाराचे नाव असलेल्या पानाची सत्यप्रत, नवीन बँक खाते
उघडणे, अनामत रक्कम पावती, दोनपेक्षा अधिक अपत्य नसल्याचे स्व-
घोषणापत्र, राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र किंवा जातवैधता समितीकडे प्रकरण सादर केल्याचा पुरावा. नगर परिषदेकडील थकबाकीदार नसल्याबाबतचे प्रमाणपत्र तसेच शौचालय असल्याचे प्रमाणपत्र आदी दस्तऐवजांची जुळवाजुळव उमेदवार करीत आहेत.

 

दिनांक 11.11.2025 रोजी नगर परिषद निवडणूक 2025 करिता प्राप्त नामनिर्देशनपत्र निरंक आहे.

‘ऑनलाइन अर्जाच्या माहितीची नोंद करताना, काळजी घ्यावी. सोबतच प्रत्यक्षपणे अर्ज सादर करताना योग्य ते दस्तऐवज, पावत्यासुद्धा जोडाव्यात. आम्ही संपूर्ण प्रक्रियेची माहिती सर्वच पक्ष, पदाधिकारी आणि संबंधित कार्यकर्त्यांना दिली आहे, तरीही अडचण उद्भवल्यास नियंत्रण आणि माहिती कक्षाकडे संपर्क साधावा.मृदुला मोरे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार,तहसील कार्यालय,मूल