Home आपला जिल्हा Breaking News मूल शहर वासीयांना हवा शिक्षित आणि समस्या सोडविणारा नैतिकता, कार्यक्षमता आणि स्वच्छ...

मूल शहर वासीयांना हवा शिक्षित आणि समस्या सोडविणारा नैतिकता, कार्यक्षमता आणि स्वच्छ चारित्र्य उमेदवार !

82

मूल नगर परिषद क्षेत्रात अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. अतिक्रमण, वाहतूक कोंडी, नाल्यांची नियमित न होणारी सफाई, कचऱ्यांचे ढिगारे, अपुरा पाणीपुरवठा,आजही मूल शहरातील वस्तीमध्ये जाणे येण्यासाठी सिमेंट रस्ता नाही प्रश्न,जमीनीचे पटे या समस्यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. यामुळे सदर समस्यांना घेऊन नागरिक आता जागरूक झाल्याचे पाहायला मिळत असल्याने यावर्षीची निवडणूक रंगतदार होणार आहे. दरम्यान, मतदारांचा कानोसा घेतला असता त्यांना तरुण, शिक्षित, तडफदार आणि समस्यांची जाण ठेवून त्या सोडविणारा नगरसेवक आणि नगराध्यक्ष हवा असल्याचे पाहायला मिळत आहे.
मूल नगरपरिषद निवडणुकीकरिता 10 प्रभाग तयार करण्यात आले आहे. प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडून दिले जाणार असून त्यापैकी एक महिला असणार आहे. तसेच सर्वसाधारण गटातून देखील महिलेला उभे राहता येणार आहे. सोबतच नगराध्यक्षपद देखील इतर मागासवर्गीय महिलाकरिता राखीव OBC असल्याने यावर्षी नगरपरिषद सभागृहात महिलांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक असणार आहे. प्रत्येक प्रभागात इच्छुक उमेदवार मतदारांच्या भेटी घेऊन त्यांचे मत जाणून घेण्याचे प्रयत्न करीत आहे. तसेच विशिष्ट पक्षाकडून उमेदवारी मिळावी म्हणून देखील त्यांचे प्रयत्न सुरू आहे. परंतु, अलीकडे मतदार जागृत झाला आहे. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले प्रश्न तो मांडताना दिसत आहे. तसेच त्याला आपल्या प्रभागातून येणारा निवडून येणारा नगरसेवक कसा असावा, याविषयीची मत देखील तो सोशल मीडियावर मांडत आहे.
शहरातील 10 ही प्रभागातील मतदारांचा आढावा घेतला असता प्रत्येक प्रभागात अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. नाल्यांची नियमित न होणारी सफाई, शुद्ध पाण्याचा अपुरा पुरवठा, कचऱ्यांचे ढिगारे, अतिक्रमण, गांधी चौकातील मुख्य बाजारपेठेतील वाहतूक कोंडी, रस्त्यावर लागणारी दुकाने अशा एक ना अनेक समस्यांचा पाढा नागरिक वाचताना दिसत आहेत. यामुळे एकंदरीत परिस्थिती बघता सर्वांनाच तरुण, शिक्षित, तडफदार आणि समस्यांची जाण ठेवून त्या सोडविणारा नगराध्यक्ष तसेच नगरसेवक हवा आहे.
दूषित पाण्यामुळे अनेकांना आजारपणाला सामोरे जावे लागले. मूल शहरातील भर चौकातआपला जीवही गमावला. परंतु, सदर प्रश्न हवेतच विरले. त्यामुळे यावर्षीच्या निवडणुकीत हे सर्व प्रचाराचे मुद्दे असू शकणार आहे. मतदार जुन्या नगरसेवकांना याबाबत नक्कीच प्रश्न विचारतील या शंका नाही. तसेच नवीन उमेदवारांमध्ये समस्या सोडवण्याची क्षमता आहे किंवा नाही ते तपासूनच मतदार मतदान करतील ते स्पष्ट आहे. यामुळे सर्वच प्रमुख पक्षांना प्रभागात नगरसेवक तसेच नगराध्यक्षाचा उमेदवार देताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.लोकशाहीसाठी निवडणूक एक नवी पहाट घेऊन आली आहे. या संधीचे सोने करण्याची जबाबदारी जशी निवडणूक आयोगाची आहे, तशीच ती राजकीय पक्षांची आणि नागरिकांचीही आहे. राजकीय पक्ष आणि नेत्यांनी केवळ सत्तेसाठी आश्वासनांची खैरात वाटू नये. त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा घेऊन जनतेसमोर जावे. खऱ्या स्थानिक प्रश्नांची जाण असणे आणि त्यावर दीर्घकालीन कशी करणार, हे जनतेसमोर सिद्ध करावे. आपल्या पक्षाच्या उमेदवारांची निवड करताना नैतिकता, कार्यक्षमता आणि स्वच्छ चारित्र्य या गुणांना प्राधान्य द्यावे. मतदारांनी देखील भावनिक आवाहनांना न भूलता आपल्या मताधिकाराचा शहराच्या विकासासाठी उपयोग करावा. उमेदवाराची गुणवत्ता, पक्षाची नीतिमत्ता व इतिहास आणि शहराच्या विकासासाठी असलेली निष्ठाही मतदारांना तपासावी लागेल. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आलेसे लोकप्रतिनिधी आपल्या घराच्या, आपल्या गल्लीच्या आणि आपल्या शहराच्या प्रश्नांची सोडवणूक करणारा असतो. जबाबदार नागरिक म्हणून फक्त मतदानापुरते जागे न राहता, आपल्या लोकप्रतिनिधींवर सतत दबाव आणि देखरेख ठेवणे हेही आपले कर्तव्य समजले पाहिजे. या निवडणुकीतून कार्यक्षम आणि दूरदृष्टी असलेले नवे नेतृत्व उदयास येईल आणि तुटलेला ‘संवाद-सेतू’ पुन्हा बांधून नागरिकांच्या पूर्तता केली जाईल, अशी आशा करू या. निवडणुकीचा बिगुल वाजला, असे आपण म्हणतो तेव्हा जनसेवेचा अर्थात लोकतंत्राचाच जागर केला जात असतो, हे साऱ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. तो सतत होत राहावा, हीच सर्व लोकशाहीवादी नागरिकांची अपेक्षा आहे.