Home आपला जिल्हा Breaking News जिल्ह्यातील ‘या’ नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी होणार निवडणुका! तारीखही जाहीर

जिल्ह्यातील ‘या’ नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी होणार निवडणुका! तारीखही जाहीर

80

मुंबई: राज्य निवडणूक आयोगाकडून नुकतीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायत यांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.
त्यानुसार राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान होईल. तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाईल. दरम्यान, कोणत्या जिल्ह्यात किती नगरपरिषदा आणि नगरपंचायती आहेत हे आपण सविस्तर जाणून घेऊया.
पाहा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती नगरपरिषदा आणि नगरपंचायती
ठाणे जिल्ह्यातील नगरपरिषदा
चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषदा
बल्लारपूर
भद्रावती
भिसी (न.पं.)
ब्रह्मपूरी
चिमूर
गडचांदूर
घुग्घुस
मूल नागभीड राजूरा वरोरा

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची महत्वाची पत्रकार
परिषद आज ( दि. ४ ) रोजी पार पडली. यावेळी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राज्यातील बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची
घोषणा केली.
गेली अडीच ते तीन वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या होत्या. परंतु आता खऱ्या अर्थाने निवडणूका मार्गी लागल्या असून आयोगाने नगरपरिषदा व नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात नगरपरिषद, नगरपंचायत यांच्या निवडणुका होतील. राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायती करिता ही निवडणूक होणार आहे.
246 नगरपरिषदांची ( यापैकी 10 नवीन ) निवडणूक होणार आहे. यातील 236 नगरपरिषदांची मुदत यापूर्वीच संपली आहे. 147 पैकी 42 च्या निवडणुका होत आहेत, त्यात 15 नवीन आहेत. त्यात 27 ची मुदत संपल्याने त्यांचा समावेश आहे. उर्वरित 105 ची मुदत संपलेली नसल्याने त्यांच्या निवडणुका नाहीत.