मूल शहरातील अंतर्गत रस्ताच्या समस्या बांधकामाला उशिर किती?
गोवर्धन ते पठाण पर्यंतचा रस्ता : निधी मंजूर, मात्र बांधकाम अडले
मूल शहरातील विश्रामगृह समोरील गांधी चौकात जाण्यारा रस्ताला लागून मागाील कित्येक वर्षापासून निधी मंजूर झालेला असून सुध्दा आजपावतो कुणी जनप्रतिनिधी,न.प.प्रशासक तसेच बांधकाम विभाग पाहायला तयार नाही विधानसभाच्या निवडणूकीच्या वेळी रस्ताचा उदघाटन सुध्दा केलेला होतो जुन्या वस्तीतील नागरीकांना वाटंल आता सिमेंन्ट रस्ता होणार परंतू ते एक दिवास्वप्न् दिसत आहे. येणा—या समोरील न.प.मूलच्या निवडणूकीत मतदान करायचं कि नाही असं वार्ड वासीयांनी बोलत होते.सिमेंट कॉंक्रीट रस्ता बांधकामासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला. कामाला सुरुवात अजून पर्यंत झाली नाही . मात्र, बांधकामास आणखी किती उशिरा पूर्ण करणार, असा प्रश्न नागरिक आणि वाहतूकदारांकडून उपस्थित केला जात आहे.विकास कामे मंदावली मूल शहरात अंतर्गत रस्ते बहूंताश खूप प्रभाग मधीलअद्यापही अपूर्ण आहे. त्यामुळे रस्त्याचे काम थांबले असून, शहर विकासाचा वेग मंदावला असल्याचे मूल शहरवासीयांकडून बोलले जात आहे.वाहतुकीची कोंडी, घरादारांत शिरते पाणी
अर्धवट राहिलेल्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पाणी साचते, अपघात होतात आणि पावसाळ्यात घरात पाणी शिरण्याच्या घटना घडतात. माती व खडी रस्त्यावर विखुरल्याने वाहनधारक त्रस्त आहेत. यासाठी वेळीच रस्त्याचे बांधकाम पूर्ण होणे गरजेचे आहे.समन्वयाच्या अभावामुळे नागरिक त्रस्त
नगरपालिकेच्या बांधकामात समन्वयाचा अभाव स्पष्ट दिसत आहे. परिणामी, रस्ता विकासाची कामे थांबली असून, नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. निधी असूनही हा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिका प्रशासनातील अनास्था व विस्कळीत नियोजनाचा बळी ठरला आहे.






