Home आपला जिल्हा Breaking News गांधी चौकात आज सामुदायिक प्रार्थनेचा गजर

गांधी चौकात आज सामुदायिक प्रार्थनेचा गजर

82

मूल :गांधीजी सत्पुरुष अन् नव्या विचारांचे प्रवर्तक
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची २ ऑक्टोबर रोजी १५६ वी जयंती होताहेत साजरी
भारतीय स्वातंत्र्याची चळवळ गांधीजींच्या नेतृत्वात लढवली गेली आणि स्वातंत्र्याचं श्रेय पण त्यांच्याकडेच जाते. ब्रिटिशांशी लढण्यासाठी शस्त्र नाही तर शांती, अहिंसा आणि सत्याग्रहाचा मार्ग चळवळीसाठी त्यांना सापडला. हृदय परिवर्तन गांधीजींचा विश्वास होता आणि अनेक प्रसंगातून ही बाब खरी ठरली आहे.
यावर
कुटुंबवत्सल गांधीजी एक सामान्य माणूस. मात्र, नव्या विचारांचे ते प्रवर्तकही होते. आपल्या सिद्धांतामुळे जगात प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून ते गणल्या गेले. त्यांची २ ऑक्टोबर रोजी १५६ वी जयंतीनिमित्ताने त्यांच्या कार्य आणि विचारांचे स्मरण आज काळाची गरज आहे. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींच्या विचारांची जडणघडण झाली. तेथील तत्त्ववेत्त्यांच्या विचारांची ओळख झाली. यात सॉक्रेटिस, हेन्री डेव्हिड थोरो, जॉन रस्किन, लिओ टॉलस्टॉय इत्यादी होते. ह्यात जॉन रस्किन यांचे अन्टू धिस लास्ट हे पुस्तक त्यांच्या जीवनाला एक नवीन आकार देण्यासाठी खूप उपयुक्त ठरले. या पुस्तकाच्या आधारे त्यांनी सर्वोदय हे पुस्तक लिहिले. आपल्या विचारधारेला त्यांनी सर्वोदय हे नाव दिले.
गांधीजींनी विविध
क्षेत्रासाठी केले मोठे कार्य
गांधीजींनी जातीभेद, अस्पृश्यता, धार्मिक ऐक्य, दारू मुक्ती, महिलांची दास्यमुक्ती, शेतकरी कामगारांचे हक्क, शाकाहार, वस्त्र स्वावलंबन, श्रम प्रतिष्ठा, आहाराशास्त्र, निसर्गोपचार, एवढेच नाही तर पत्रकारिता यासाठी फार मोठे कार्य केले आहे. आज देशात अनेक समस्या उग्र रूप धारण करून राहिल्या आहेत. देशाचा कणा असलेला अन्नदाता आज मरणासन्न अवस्थेत आहेत. पण, यांचं भांडवल करून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील नेते बनले.
नयी तालमीतून शिकण्याची संकल्पना
गांधीजींनी आश्रमीय जीवनात श्रमप्रतिष्ठेचं तत्त्व स्वतःच्या आयुष्यात रुजवलं. काम करता करता शिकण्याची संकल्पना नयी तालीम शाळेमधून रुजवली. या सर्व घडामोडी त्यांच्या आयुष्यातील प्रभावी ठरलेल्या
व्यक्तीमुळेच शक्य झाल्या. १९०९ मध्ये गांधीजींनी हिंद स्वराज्य हे ७६ पानांची लहान पुस्तिका लिहिली. भविष्यातील भरत कसा असावा यांची कल्पना पुस्तकातून मांडली. १९१५ मध्ये गांधीजी हिंदुस्थानात आले, तोपर्यंत देशाला गांधीजींची ओळखही झाली होती. गांधीजींच्या अगोदर अनेक नेते
स्वातंत्र्यासाठी कार्य करीत होते. मात्र, गांधीजींनी सत्याग्रहाची वाट धरली. यामुळे गांधीजींच्या शब्दांना वजन आले.

मूल येथील ऐतिहासिक गांधी चौकात सुमधुर सामुदायिक प्रार्थनेची परंपरा यंदाही सुरू राहणार आहे. कलानिकेतन, श्रमिक एल्गार आणि गांधीवादी विचारांचे नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने मागील दहा वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. गांधी चौकाची निर्मिती महात्मा गांधीजींच्या ऐतिहासिक भेटीची आठवण जपण्यासाठी करण्यात आली.
सन १९३३ आणि १९३६ मध्ये गांधीजी मूल येथे थांबून सावलीकडे गेले होते. या स्मृतीप्रीत्यर्थ चौकात महात्मा गांधींचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते आणि बांधकाम मंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या अध्यक्षतेखाली, २४ डिसेंबर १९६१ रोजी या पुतळ्याचे अनावरण झाले. कै. सितारामजी गोगीरवार यांच्या स्मरणार्थ नामदेव सोमन्नाजी गोगीरवार यांच्या तर्फ हा पुतळा देणगीस्वरूप देण्यात आला होता. मूल शहराचे मध्यवर्ती व ऐतिहासिक स्थान असलेला गांधी
चौक, कालांतराने दुर्लक्षित राहिला. गांधी जयंतीसारख्या दिवशीही येथे शुकशुकाट दिसू लागल्याचे पाहून कलानिकेतनचे अशोक येरमे आणि श्रमिक एल्गारचे विजय सिद्धावार यांनी पुढाकार घेतला. त्यांनी दहा वर्षांपूर्वी सामुदायिक प्रार्थनेचा उपक्रम सुरू केला. संगीत वाद्यांच्या साथीने सादर होणारी ही प्रार्थना पावसाळ्यातही खंडित न होता आजवर सुरू आहे. या उपक्रमात स्थानिक गुरुदेव सेवा मंडळ, योग मंडळ तसेच गांधीवादी विचारांचे नागरिक उत्साहाने सहभागी होतात. यावर्षीही २ ऑक्टोबर रोजी पहाटे सहा वाजता गांधी चौक परिसरात सामुदायिक प्रार्थना आयोजित
करण्यात
आली असून, अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक परंपरेला बळ द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.