Home आपला जिल्हा Breaking News सेवा व संस्कारांनी सजलेला युवकच समाजाला खरी दिशा देतो : रविंद्र बिहेवार

सेवा व संस्कारांनी सजलेला युवकच समाजाला खरी दिशा देतो : रविंद्र बिहेवार

71

कर्मवीर महाविद्यालय मूल येथे ‘राष्ट्रीय सेवा योजना दिन’ उत्साहात साजरा.
मुल : शिक्षण प्रसारक मंडळ, मुल संचालित व गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली संलग्नित कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे वरिष्ठ व कनिष्ठ विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहपूर्णवातावरणात साजरा करण्यातआला. प्रास्ताविकात रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रवीण उपरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व अधोरेखित करतानायुवकांमध्ये सेवा, शिस्त व सामाजिक जाणिवा दृढ करण्यासाठी या उपक्रमाची आवश्यकता स्पष्ट केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्था नी प्राचार्य डॉ. अनिता वाळके होत्या. प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक व सेवानिवृत्त शिक्षक रविंद्र बिहेवार (लोकसेवा विद्यालय, नवरगाव) उपस्थित होते. तसेच प्रा. दिनेश बनकर (पर्यवेक्षक), डॉ. अतुल पारखी, प्रा. अनिल शेलेकर व प्रा. राहुल बोधे यांची उपस्थिती लाभली.

प्रमुख अतिथी बिहेवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ‘युवकांनी ग्रंथवाचनाची सवय लावून वास्तवाचे भान ठेवावे. स्त्री सशक्तीकरणाला प्रोत्साहन देणे हे युवकांचे कर्तव्य आहे. सेवा, शिस्त व संस्कारांनी सजलेला युवकच समाजात सकारात्मक बदल घडवून आणतो आणि समाजाला खरी दिशा देतो. ‘ अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांनी राष्ट्रीय सेवा योजना दिन हा सामाजिक जाणिवा, शिस्त व सेवाभाव जोपासण्याचा दिवस असल्याचे नमूद केले. युवकांनी वाचन, संस्कार व सेवाभाव यांच्या माध्यमातून जबाबदार नागरिक होण्याचा संकल्प करावा, असे त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमापूर्वी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर ‘स्वच्छता ही सेवा पंधरवडा’ अंतर्गत स्वयंसेवकांनी महाविद्यालय परिसर स्वच्छ करून स्वच्छतेचा संदेश दिला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. समीर अल्लुरवार यांनी केले, तर आभार प्रा. अनिल शेलेकर यांनी मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.