ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया आजपासून, अकरावी @आवश्यक ते सर्व दाखले सेतू कार्यालयातून तत्काळ काढून घ्यावेत

29

दहावीचा ऑनलाइन नुकताच जाहीर झाला.  यंदा माहे जून २०२५ पासून इयत्ता ११ वी कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रवेशाची व्याप्ती राज्यस्तरीय वाढविण्याच्या दृष्टीने इयत्ता ११ वीचे सर्व प्रवेश ऑनलाइन करण्यात आले आहेत. सोमवारपासून (दि. १९) विद्यार्थ्यांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
रजिस्ट्रेशन नसल्यास कोणत्याहीमहाविद्यालयात प्रवेशमिळणार नसल्याचीमाहिती माध्यमिकशिक्षण विभागाने दिली आहे. प्रवेशासंदर्भात कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक शाळांची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाने दिली आहे. अकरावी प्रवेशप्रक्रियेसंदर्भात पुणे विभागाच्या सहायक शिक्षण उपसंचालकांनी जिल्ह्यातील सर्व प्राचार्यांची व्हीसी घेऊन माहिती दिली आहे. पालकांनी प्रवेशासाठी आवश्यक ते सर्व दाखले सेतू कार्यालयातून तत्काळ काढून घ्यावेत.ऑनलाइन प्रवेशासंदर्भात पालकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी ही सोय करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारीकार्यालयाने दिली आहे.
(माध्यमिक)१९ ते २८ मेपर्यंत रजिस्ट्रेशन सुरू राहीलदहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी १९ ते २८ मे २०२५ या कालावधीत रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक केले आहे. यासंदर्भातील वेबसाइट लवकरच शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात येणार आहे. याच काळातविद्यार्थ्यांनी पसंतीचे महाविद्यालयनिवडावे, असेही कळविण्यात आले आहे.सर्व विद्यार्थ्यांनामिळणार प्रवेशमहाविद्यालयांना नोंदणी करण्यासाठी सांगितले आहे. यंदा ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहेत. त्यासंदर्भातील सूचना महाविद्य देण्यात आल्या आहेत. यंदाची अकरावी प्रवेशप्रक्रिया अत्यंत पारदर्शक होणार असून, कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची काळजी शिक्षण विभाग घेणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
अशी आहे प्रवेश प्रक्रिया
नोंदणी १९ मेपासून, विद्यार्थी रजिस्ट्रेशनची अंतिम मुदत २८ मे २०२५, सर्वसाधारण यादी जाहीर करणे, त्रुटी, तक्रारींचे निराकारण करणे, पहिली गुणवत्तायादी जाहीर करणे, प्रवेशासाठी मुदत देणे, विद्यार्थी रजिस्ट्रेशन व कॉलेज पसंती, दुसरी गुणवत्तायादी जाहीर,
अकरावी प्रवेशप्रक्रिया सुरू, विद्यार्थी रजिस्ट्रेशन व कॉलेज
पसंती, तिसरी गुणवत्तायादी.
कागदपत्रे व वेळीच शुल्क भरणे आवश्यक
विद्यार्थ्यांनी संबंधित बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी. नोंदणीनंतर प्रवेश अर्ज भरावा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. शुल्क भरणे आवश्यक आहे. काही अभ्याक्रमांमध्ये निवड चाचणी, प्रवेश परीक्षा राहील. त्यासाठी विद्यार्थ्यांना उपस्थित राहावे लागेल. त्यानंतर विद्यार्थ्यांना निवडीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.