मुल तालुक्यातील भादुर्णी@वाघाचा कहर : तेंदूपत्ता संकलन करताना आणखी एका महिलेचा मृत्यू

60

वाघाचा कहर : तेंदूपत्ता संकलन करताना आणखी एका महिलेचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनास सुरुवात झाली असून जंगलगच्या गावातील नागरिक आपली रोजी रोटी भागविण्यासाठी वाघाची भीती असतांना देखील तेंदुपत्ता संकलनासाठी जात असतात.
आज १२ मे २०२५ रोजी मुल तालुक्यातील भादुर्णी येथील महिला भुमिका दिपक भेंडारे (३०) मु. केवाडा (पेट) येथील असून भादुर्णी येथील भाऊजी गावतुरे यांची मुलगी ही सकाळी ८ वाजता तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेली असता जंगलात झुडुपांमध्ये असलेल्या वाघाने महिलेवर हल्ला करुन तिला जागीच ठार केले.