अजय टेप्पलवार यांना जाहीर महाराष्ट्र शासनाचा गुणवंत अधिकारी पुरस्कार

48

महाराष्ट्र शासनाचा गुणवंत अधिकारी पुरस्कार अजय टेप्पलवार यांना जाहीर
चंद्रपूरः महाराष्ट्र शासनानेसन २०२३ २४ मुल्यांकन वर्षावर आधारीत गुणवंत अधिकारी, कर्मचारी पुरस्कारासाठी चंद्रपूर जिल्हा परिषद, सामान्य प्रशासन विभागातसहा.प्रशासन अधिकारीपदावर कार्यरत अजय शामराव टेप्पलवार यांची निवड केली आहे.
दि. ९ मे २०२५रोजी निवड करण्यात आली आहे. यामध्ये विविध संवर्गाच्या ३४ अधिकारी / कर्मचाऱ्यांची गुणवंत कर्मचारी म्हणून निवड झालेली आहे. अजय टेप्पलवार हे जिल्हा परिषद चंद्रपूर सेवेत कनिष्ठ सहाय्यक या पदावर २६ मार्च १९९७ रोजी रुजू झाले असून त्यांनी विविध पदावर विविध काम करीत उत्कृष्ठ काम केले आहेत. शासकिय कामकाजा – सोबतच महा. राज्य जिल्हा परिषद कर्मचारीमहासंघाच्या विविध पदावर काम करत सहकार्याची कर्मचाऱ्यांच्या हिताची भुमीका घेत लोकप्रियता मिळविलेली सध्यास्थितीत ते महा. राज्य जिल्हा
आहे.परिषद कर्मचारीमहासंघाच्याजिल्हा शाखाअध्यक्ष म्हणूनकार्यरत आहेत.
महा. राज्य जिल्हापरिषद कर्मचारीमहासंघाचे राष्ट्रीयअध्यक्ष व अखिल भारतीयकर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय
उपाध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले,सरचिटणीस संजय म्हाळणकर सरचिटणीस प्रकाश सुरमवार, सचीव शरद तिरणकर, कोषाध्यक्ष नंदु गोलर, रंजना कोहपरे, अध्यक्ष गिता खामणकर, सचिव म. राज्य नर्सेस संघटना, पुंडलीक पाल, अध्यक्ष वि.अ. (सां) संघटना, कुशल बडवे यांनी अभिनंदन केले.