मूल शहरातील नगर परिषद मूल हदीमधील वास्तव्यास असणा—या पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी राज्यशासनाने मोदी आवास योजना राबविण्यास आॅनलाईन अर्ज चालू झालेले आहे.नगर परिषद मूल प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 मंजुरी करीता वेब पोर्टल
लाभार्थी पात्रतेचे हे आहेत निकष
1 भारतामध्ये लाभार्थी तसेच कुटुबांमधील ईतर सदस्यांचा नावे पक्के घर नसावे.
2. लाभाथ्याने गेल्या 20 वर्षात कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
3. वार्षिक उत्पन्न मर्यादा 3 लक्ष रूपये कमाल राहील
नवीन घरकूल मंजुरीसाठी लागणारे कागदपत्रे
1. अर्जदाराचे आधारकार्ड आधार क्रमांक आधारनुसार नांव जन्मतारीख
2. कुटूंबातील सदस्याचे आधार तपशील आधार क्रमांक आधारनुसार नांव जन्मतारीख
3. अर्जदारांचे आधारला लिंक असलेले सक्रिय बॅंक खाते तपशील खाते क्रमांक,बॅंकेचे नाव,
4. उत्पनाचा दाखला वार्षिक 3 लाखापर्यंत
5. जात प्रमाणपत्र एस.सी.एस.टी. किंवा ओबीसी च्या बाबतीत
6. जमीन दस्तऐवज खरेदी,बक्षिसपत्र,अकृषक परवानगी,7/12 आणि नमूना 8 कर पावती,कर आकारणी,खरेदी नसल्यास मागील 3 वर्षाची कर पावती,नोंदणीकृत अभियंतेच्या नकाशा,जागेसंबधी प्रतीज्ञापत्र
7 भारत देशात कुठेही पक्के घर नसल्याचे बाबतचे प्रतिज्ञापत्र
8 सद्या स्थितीत घराचा फोटो
9 रेशनकार्ड
वरील सर्व कागदपत्रांची मुळ प्रत वेबसाईडवर अपलोड
कराव्यात व काढलेल्या अर्जाची प्रिंटसोबत संपूर्ण
कागदपत्रांची एक प्रत नगरपरिषद मूल कार्यालयात जमा करावे