मूल :— शहरातील किरकोळ वादातून जिल्ह्यातील मुल येथे युवकाची चाकूने वार करीत निर्घृण हत्या केली. मुल शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून यामागे अवैध धंदे असल्याचे बोलले जात आहे. काल रात्री १०.३० च्या सुमारास ऋतिक शेंडे वय २४ वर्ष याची चाकूने वार करीत निर्घृण हत्या करण्यात आले होते. ऋतिक शेंडे मुल येथील विहीरगाव परिसरात राहत असून पंचायत समिती समोरील महामार्गावर चार – पाच युवकांनी त्याच्यावर चाकूने वार केले. मारेकरी गांजाच्या व्यवसायात गुंतल्याचे बोलले जात आहे. ऋतिक ला थांबवून वाद केले व विरोध केला असता त्याच्यावर ठिकठिकाणी चाकूने वार करण्यात आले. त्याला स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत्यू घोषित केले. अधिक तपास मुल पोलीस करत असून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सुद्धा आरोपीचा मागावर आहेत.