मुल चे सेतू संचालक प्रमोद मशाखेत्री लघु उद्योजक म्हणून सन्मानित

25

मूल :— भारत सरकारच्या सुक्ष्म लघू आणि माध्यम उद्योम मंत्रालयाच्या वतीने मुल येथील प्रेरणा आपले सरकार सेवा सेतू केंन्द्रचे संचालक प्रमोद मशाखेत्री यांना पिएम विश्वकर्मा लाभार्थी स्वनिधी योजना चे प्रमाणपत्र देवून त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे.

नूकतेच त्यांना भारत सरकारच्या सुक्ष्म लघू आणि मध्यम उध्यम मंत्रालयाच्या वतीने प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे. तसेच त्यांना वेंडर क्रमांक मिळालेला आहे. मागील अनेक वर्षापासून प्रमोद मशाखेत्री हे फुटपाथ दुकान टाकून सेतू केंन्द्र चालवित आहे. त्याच्या सेतू केंन्द्राच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना राबविल्या जात आहे त्यांचा फायदा शासकीय योजनेचा लाभ घेणारा—या लाभाथ्र्याना होत आहे. त्यांनी कोरोना काळात विश्वकर्मा योजना मध्ये स्वनिधी योजनेचा लाभ मिळाला म्हणून प्रयत्न केलेला होता.त्यांची दखल घेवून सुक्ष्म लघू माध्यम मंत्रालयाने त्यांना उधम असीस्टस सटीफिकेट प्राप्त झाले.

त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. प्रमोद मशाखेत्री यांचे शिक्षण पदव्यूतर झाले असून ते पंचायत समिती समोर मागील कित्येक ​वर्षापासून फुटपाथच्या जागेवर आपला व्यवसाय
करीत आहे.या योजनेमध्ये प्राथमिक स्वरूपात दहा हजार रुपये कर्ज स्वरूपात त्यांना मिळाले
या कर्जाला वर्षभराची फेड केल्यानंतर स्टेट बॅंक आफ इंडीया मूल मधून बारा महिन्यात नियमित कर्ज परतफेड केल्यामुळे तर शासनामार्फत दुसऱ्या वर्षात वाढीव कर्ज 20,000 कर्ज मिळाले ते परतफेड केले आता पन्नास हजार रूपये कर्जसाठी केस टाकली आहे .

सन्मान सामथ्र्य समृध्दी हि पिएमविश्कर्मा योजनेची उध्दष्टे आहे. तसेच पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी आत्मसन्माने आत्मबलाने आणि श्रम परीश्रमाने कार्य करणा—या व्यक्तीचा विशेष गौरव केलेला आहे. त्यामूळे प्रमोद मशाखेत्री यांचे पुढील आत्मनिर्भार तेचे स्वप्न पूर्ण होणाच्याा मार्गावर आहे.एक लघू उद्योजक म्हणून त्यांची शासकीय नोंद झालेली आहे.