मूल /तालुका प्रतिनिधी
सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल अंतर्गत असलेल्या विविध समित्यांच्या सदस्यांना आपल्या पाल्यांना मार्गदर्शन होण्याच्या दृष्टीने शिक्षक व सदस्यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन आज 22 सप्टेंबर ला करण्यात आले. शाळा सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रा. मारोतराव पुल्लावार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणुन गडचिरोलीचे सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी जे. एच. राऊत होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक मारोती कोकाटे, सुखदेव चौथाले, गणेश मांडवकर, प्रशांत बोबाटे, सुनिल गायधने, अमोल चुधरी,उषा शेंडे, विद्या बोबाटे, लिना बद्देलवार, संजय मारकवार, रमेश गणवेनवार , शाळेचे मुख्याध्यापक अविनाश जगताप, पदवीधर शिक्षक राजू गेडाम आदी उपस्थित होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शक जे . एच.राऊत यांनी विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी विविध पैलुवर पालकांशी चर्चा केली. आपला मुलगा भविष्यात चांगला नागरीक घडविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी विविध उदाहरणे देत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षक बंडु अल्लीवार, प्रास्ताविक मुख्याध्यापक अविनाश जगताप तर उपस्थितांचे आभार सहाय्यक शिक्षिका रिना मसराम यांनी मानले.
Home आपला जिल्हा Breaking News सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल अंतर्गत असलेल्या विविध समित्यांच्या सदस्यांना आपल्या पाल्यांना...






