सुभाष उच्च प्राथमिक शाळा मुल येथे शिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सत्कार.

32

मूल/प्रतिनिधी
भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधकृष्णन् यांचा जन्म दिवस संपुर्ण भारत देशात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल येथे आज दिनांक ५ सप्टेंबर रोज गुरूवारला शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
या निमित्ताने समाजात आपली अमीट छाप निर्माण करणाऱ्या गुरुजनांचा सत्कार कार्यक्रम सुभाष उच्च प्राथमिक शाळा मुलचे अध्यक्ष नरसिंग गनवेणवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. समितीचे सदस्य रुपेश पाटील मारकवार,माजी सैनिक मारोती कोकाटे , सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बोबाटे,शाळेच्या समिती चे पदाधिकारी सर्वस्वी
सुवर्णा पिपरे,इंदुताई मडावी, ज्योती मोहबे, रोशनी लाटेलवार, उषा थोरात, लिना बद्देलवार, नावेद शेख,नरेंद्र कामडी, शाळेचे मुख्याध्यापक अविनाश जगताप व सर्व समितीचे सदस्य उपस्थित होते.यावेळी प्रा. मारोतराव पुल्लावार, ग्रामगीताचार्य सुखदेव चौथाले, ग्रामगीताचार्य गणेश मांडवकर यांचा शाळेचे अध्यक्ष नरसिंगभाऊ गनवेणवार व मान्यवरांच्या हस्ते शाल,

 

श्रीफळ व पुष्प गुच्छ देवुन सत्कार करण्यात आला.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने श्री. नरसिंगभाऊ गनवेणवार यांचे कडुन शाळेला दोन फोम चेअर भेट देण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वयशासन उपक्रमा अंतर्गत वर्गात अध्यापनाचे काम करून उत्साह वाढविला.शाळेंची गुणवत्ता व दर्जा वाढविण्यासाठी कोणत्याही प्रकारची उणीव भासु न देण्याचा मानस श्री. नरसिंगभाऊ गनवेणवार व श्री. रूपेश पा मारकवार यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षिका रिना मसराम, प्रास्ताविक मुख्याध्यापक अविनाश जगताप तर उपस्थितांचे आभार विद्यार्थिनी समीक्षा शेंडे हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी तेसाठी शाळेतील शिक्षक राहुल मुंगमोडे,योगेश पुल्लकवार, बंडु अल्लीवार, अजय राऊत, सौ. निशा जगताप यांनी परिश्रम घेतले.