Home आपला जिल्हा Breaking News सुशिक्षित युवक व्यवसायिक कर्जापासून वंचित

सुशिक्षित युवक व्यवसायिक कर्जापासून वंचित

111

मूल : युवकांना स्वयंरोजगार थाटता यावा या उद्देशाने राज्य शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरू केला आहे. यासाठी ग्रामीण भागातील शेकडो युवकांनी अर्ज केले आहेत. प्रकरणे मंजूर होऊन संबंधित बँकांकडे आली. मात्र अनेक राष्ट्रीयकृत बँकांनी मार्च एंडिंग सारखी किरकोळ कारणे सांगत तरुणांचे कर्ज प्रकरण निकालीच काढले जात नसल्याने तरुण व्यवसायिक कर्ज प्रकरणापासून वंचित असूनव्यवसाय थाटायचा कसा असा प्रश्नतरुणांसमोर उभा ठाकला आहे. नोकरी अभावी अनेक जण स्वतःच्या व्यवसायाकडे वळत आहेत. मात्र त्यांना भांडवल मिळत नसल्याने ते उद्योग थाटू शकत नाही. परिणामी बेरोजगारीचा आकडा वाढू लागलेला आहे. त्यामुळे शासन प्रयत्नरत जरी असले तरी बँकांनी जाचाकटी लावत तरुणांना कर्ज देण्यास विलंब तर काही प्रकरणे नामंजूर करत असल्याने तरुणांमध्ये नैराश्याचे वातावरण पसरले आहे.
प्रशिक्षण घेऊनव्यवसायासाठी मुख्यमंत्रीरोजगारनिर्मितीकार्यक्रमांतर्गत अर्ज दाखल केला आहे. मात्र जवळपास चार महिने लोटूनही व्यवसायासाठी कर्ज मिळाले नसल्यानेव्यवसायउभारायचा कसा असा प्रश्नपडला आहे.प्रशांत गणवीर, बेरोजगार युवक बेरोजगार युवकांमध्ये नैराश्यमुल तालुक्यातील चिचाळा येथील बँक ऑफ इंडियाच्या चिंचाळा शाखेतही अनेक प्रकरणे जवळपास चार महिन्यापासून पेंडिंग आहेत. मात्र बँक व्यवस्थापकांनी या प्रकरणांकडे दुर्लक्ष करीत असल्याने तरुण अडचणीत सापडले आहेत. शासनाची योजना जरी चांगली असली तरी बँका लाभार्थी तरुणांवर अविश्वास दाखवत असल्याने बँका तरुणांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतात परिणामतः अनेक तरुण व्यवसाय पासून दूर आहेत