सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून अनुसूचित जाती, प्रवर्गातील विदयार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, राज्य शासनाच्या शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क प्रतीपूर्ती योजना,राजर्षी शाहू महाराज मॅट्रिकोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यवसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना निर्वाह भत्ता (विदयावेतन) इ. योजना माहिती व तंत्रज्ञान विभाग महाराष्ट्र शासन,यांनी विकसित केलेल्या “महाडिबीटी पोर्टल” या प्रणालीद्वारे ऑनलाईन राबविण्यात येत आहेत.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणा-या शिष्यवृत्ती. फ्रीशिप व इतर शैक्षणिक योजनांचे सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षीय व नुतनीकरणाचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन भरण्यासाठी तसेच सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील अर्ज Re-apply करण्यासाठी विद्यार्थ्यांना दि. 11 ऑक्टोबर, 2023 पासून महाडिबीटी पोर्टल माहिती तंत्रज्ञान विभागाकडून सुरु करण्यात आलेले आहे. तर दि. 31 मार्च 2024 पर्यंत अर्ज भरण्यासाठी सुविधा देण्यात आली होती. दि.30 मार्च 2024 रोजीचे महाडिबीटी मुखपृष्ठावरील सूचनेनुसार दि. 30 एप्रिल 2024 पर्यंत शासनाकडून मुदतवाढ देण्यात आलेली आहे.






