लोकसभा मतदारसंघात जनमानसात इतका प्रभाव पडला आहे की चहुबाजूंनी प्रतिभाताई धानोरकर यांची लाट असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.लोकसभा निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटनासाठी मूल शहरात आगमन होताच स्थानिक गांधी चौकात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन प्रचार कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी बोलताना *ही लढाई हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची* आहे त्यामुळे पक्षातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आपापसातील भेदभाव विसरुन एकदिलाने प्रचार करुन महाविकास आघाडीचे उमेदवार यांचे पाठीशी उभे राहून मला भारताच्या सर्वोच्च सभागृहात आपली सेवा करण्याची संधी द्यावी त्यासाठी १ल्या क्रमांकाचे बटन दाबून मतदान करण्याचे आवाहन याप्रसंगी बोलताना प्रतिभा धानोरकर यांनी केले.
धानोरकर यांचे मूल तालुका प्रचार कार्यालयाचे ३१मार्च रोजी संध्याकाळी साडेआठ वाजता उद्घाटन स्थानिक काॅंग्रेस भवन मूल येथे उद्घाटन करण्यात आले , याप्रसंगी कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यकर्ते संवाद कार्यक्रमात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत,माजी आमदार देवराव भांडेकर,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार, विनोद अहिरकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ सदस्य बाबासाहेब वासाने,यांचेसह कांग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना,आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते भेदभाव विसरुन मोठ्या संख्येने उपस्थित होते,हे विशेष.
यानिमित्ताने मंचावर विराजमान नेत्यांची वक्तव्ये, प्रास्ताविकातून तालुका अध्यक्षांनी मांडलेला गोषवारा ,महाविकास आघाडीचे सरकार असताना केलेले कार्य , तालुक्यातील ग्रामपंचायत वर असलेले वर्चस्व आणि सहकारी सोसायट्यांवर संतोष रावत गटाचे वर्चस्व,कृउबास ताब्यात असणे यांचा उहापोह संतोष रावत यांचे तालुक्यातील राजकारणात किती महत्त्व आहे हे स्पष्ट करीत होते तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांचे वक्तव्य त्यांच्या नियमीत शैलीची चमक दाखवत नव्हते, जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या वक्तव्यात गटागटातील धुसफूस अजूनही संपलेली नाही हे लपवू शकत नव्हते म्हणून ते वारंवार आपापसातील हेवेदावे विसरून एकत्रितपणे काम करण्याची गरज प्रतिपादीत करीत होते व मतदारांना घरातून बाहेर काढून मतदान केंद्रावर पोहोचवण्याची आग्रही मागणी करीत होते, पहिल्या क्रमांकावर पंजा आहे तर दुसऱ्या क्रमांकावर कमळ आहे हेही स्पष्टपणे सांगत पहिल्या क्रमांकाचे बटन दाबून मतदान करण्याचे आवाहन करीत होते.याचा काय अर्थ काढायचा तो मायबाप मतदार राजाला चांगलाच ठाऊक आहे.
प्रतिभा धानोरकर मात्र या मतदारसंघातून दुसऱ्यांदा एका महिलेला संसदेच्या सर्वोच्च सभागृहात आपल्या सेवेसाठी पाठविण्याची विनंती करतांना उमेदवारी मिळवण्यासाठी अकारण झालेल्या त्रासाचे शल्य लपवून ठेवू शकल्या नाहीत आणि तरीही झाले गेले विसरून येणारी निवडणूक ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची लढाई असल्याचे स्पष्ट करत आपल्याला तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता स्पष्ट करीत सगळ्यांनी आपल्या परीने सहकार्य करावे व जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मला खासदार म्हणून निवडून देण्यासाठी पहिल्या क्रमांकावर असलेल्या पंजा या बोधचिन्हासमोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन करतात.(कार्यकर्ते घोषणा देतातं)







