Home आपला जिल्हा Breaking News आदर्श आचारसंहिता आजपासून लागू

आदर्श आचारसंहिता आजपासून लागू

74

मुंबई: निवडणूक आयोगाकडून आज लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरात सात टप्प्यात मतदान होणार असून 19 एप्रिलला मतदानाची सुरुवात होणार आहे. अशातच लोकसभा निवडणूक योग्य प्रकारे पार पडण्यासाठी आचारसंहिता लागू केली जाते.

ज्यामुळे निवडणुकांमध्ये काही अडचण येणार नाही. आजपासून ही आचारसंहिता लागू होईल.

येत्या लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली असून यामध्ये काय सुरु राहणार आणि बंद राहणार हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

आचारसंहिता लागू झाल्यानंतरही ही 10 कामं सुरूच राहणार
1. पेंशनचं काम
2. आधारकार्ड बनवणं
3. जाती प्रमाण पत्र बनवणं
4. वीज आणि पाण्यासंबंधी काम
5. साफसफाई संबंधी काम
6. वैद्यकीय उपचारासंबंधी मदत घेणं
7. रस्त्याच्या दुरुस्तीचं काम
8. सुरू असलेला प्रकल्पही थांबणार नाही
9. आचारसंहितेचं कारण पुढे करून अधिकारी तुमची ही कामं टाळू शकणार नाहीत
10. ज्या लोकांनी घराच्या आराखड्यासाठी आवेदन दिलंय, त्यांचे आराखडे पास होतील. पण नवीन आवेदनं स्वीकारली जाणार नाहीत.

आचारसंहितेमुळे या गोष्टींवर बंदी
1. सार्वजनिक उद्घाटन, भूमिपूजन बंद
2. नव्या कामांचा स्वीकार बंद
3. सरकारी कामांचे होर्डिंग्ज लावले जाणार नाहीत
4. मतदार संघांत राजकीय दौरे नाहीत
5. सरकारी वाहनांना सायरन नाही
6. सरकारी कामकाजाचे होर्डिंग्ज काढून टाकले जातील
7. सरकारी भवनांमध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री राजकीय व्यक्ती यांचे फोटो चालणार नाहीत.
8. वर्तमानपत्र, इलेक्ट्राॅनिक आणि इतर मीडियात सरकारी जाहिराती देता येणार नाहीत
9. कुठल्याही लाचखोरीपासून स्वत:ला बाजूला ठेवा. घेऊ नका, देऊ नका.
10. सोशल मीडियावर पोस्ट करण्याआधी या गोष्टींचा विचार करा. तुमची एक पोस्ट तुम्हाला तुरुंगात पोचवू शकते. म्हणून कुठलीही पोस्ट शेअर करण्याआधी आचारसंहितेचा विचार करा. हे नियम सर्वसाधारण व्यक्तींनाही लागू होणार.

तुम्ही एखाद्या नेत्याचा प्रचार करत असाल, तरीही तुम्हाला आचारसंहितेचा भंग करता येणार नाही. तुरुंगवास होऊ शकतो. निवडणुकांची घोषणा केल्यानंतर निवडणूक आयोग सोशल मीडियावर देखील लक्ष ठेवणार असून त्याच्या खर्चाचा तपशील देखील आता निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागणार आहे. त्यामुळे आता निवडणूक प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर करताना उमेदवारांना देखील काळजी घ्यावी लागणार आहे.

दरम्यान, केवळ राजकीय पक्ष किंवा नेत्यांनीच नाही तर सामान्य माणसानेही आचारसंहितेचा भंग केल्यास त्याला तुरुंगात जावे लागू शकते. या सर्व नियमांचे उल्लंघन करताना कोणी आढळल्यास त्याच्यावर आदर्श आचारसंहितेनुसार कठोर कारवाई केली जाईल. आचारसंहितेचे उल्लंघन करणारी कोणतीही गोष्ट तुम्ही केल्यास तुमच्यावर तत्काळ कारवाई केली जाईल. तुम्हाला तुरुगांतही टाकलं जाऊ शकतं.