Home आपला जिल्हा Breaking News महिला दिनाच्या शुभपर्वावर ग्राहक जागृती सप्ताहाची सुरुवात

महिला दिनाच्या शुभपर्वावर ग्राहक जागृती सप्ताहाची सुरुवात

132

मूल शहरातील प्रेरणा आँनलाईन केंद्र येथे , ८मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या शुभपर्वावर जागतिक ग्राहक दिन १५मार्च पर्यंत महिला ग्राहक जागृती सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी या केंद्रात उपलब्ध महिला ग्राहकांना विश्वकर्मा योजने अंतर्गत प्रमाणपत्रांचे वाटप करुन त्यांना आँनलाईन केंद्रावर नमूद दरापेक्षा अधिक दर कुणालाही देऊ नये , शासकीय दरानेच दाखले प्राप्त करावीत याविषयी ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या मूल तालुका शाखा मूल चे अध्यक्ष दीपक देशपांडे यांनी सविस्तर माहिती दिली.
तसेच आपण बाजारात कोणत्याही गोष्टी खरेदी करताना त्यावरील छापील किंमत ,हवाबंद वस्तुंची पॅकिंग तारीख व वापरण्याची अंतिम तारीख बघूनच वस्तू खरेदी करावी.
या वस्तू खरेदी करताना , आपल्या आवडीची वस्तू निवडण्याचा आपला अधिकार ,आणि ती वस्तू वापरल्यावर आपल्या सुरक्षिततेचा अधिकार ,तसेच वस्तूंमध्ये ठराविक मुदतीत बिघाड झाल्यास वस्तू बदलून वा दूरउस्त करुन मिळण्याचा आपला अधिकार असल्याचे समजावून सांगताना आपण त्याविरोधात न्याय कसा मिळवू शकतो याबाबत माहिती पटवून दिली.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूल चे वतीने आजपासून १४मार्च पर्यंत ग्राहक जागृती सप्ताहाची सुरुवात केली असून सकाळी ८ते१०या वेळात , मुक्तांगण किसान चौक सोमनाथ रोड मूल येथे व दूपारी १२ते०३या वेळात प्रेरणा आँनलाईन केंद्र, पंचायत समितीच्या बाजूला चंद्रपूर रोड मूल येथे ग्राहकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूलचे पदाधिकारी उपस्थित असतील व जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ग्राहकांना सहकार्य करतील असे दीपक देशपांडे अध्यक्ष ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूल यांनी जाहीर केले व संभ्रमीत ग्राहक , फसवणूक झालेले अथवा आपल्या अधिकारासाठी लढणाऱ्या ग्राहकांनी संपर्क साधावा असे आवाहन केले.
याप्रसंगी बोलताना प्रेरणा आँनलाईन केंद्र संचालक प्रमोद मशाखेत्री यांनी सोमवार दिनांक ११मार्च ते १४मार्चपर्यंत महिला आरक्षणाच्या लाभासाठी तहसीलदार यांचेकडून प्राप्त करावयाचे प्रमाणपत्र आमचे प्रेरणा आँनलाईन केंद्रावर महिलांना मोफत काढून देण्यात येईल. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे:-तीन वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला , शिधापत्रिका, आधारकार्ड , सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.
त्याचा लाभ विशेष महिला ग्राहक जागृती सप्ताहात महिलांनी घ्यावा असे आवाहन याप्रसंगी केले व आजच्या प्रसंगी काही प्रमाणपत्र महिलांना मोफत वाटण्यात आलेत.
आजच्या या महिला ग्राहक जागृती सप्ताहाची सुरुवात महिला सक्षमीकरणासाठी या केंद्रावर कार्यरत महिला कर्मचारी पौर्णिमा हजारे यांचे हस्ते लाभार्थी महिलांना प्रमाणपत्र वाटप करुन करण्यात आले. याप्रसंगी या केंद्रावर कार्यरत कर्मचारी विवेक मुनगेलवार सह इतरही लाभार्थी स्त्रीपुरूष व ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूल चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते . या अभियानाचे उपस्थितांनी स्वागत व अभिनंदन केले.