शहरात मोकाट कुत्रे, डुक्कर व जनावरांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे रस्त्याने चालताना असुरक्षिततेचे वातावरण तयार झाले आहे. रात्री – अपरात्री तर या मोकाट प्राण्यांपासून वाचण्यासाठी जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. मात्र पालिका प्रशासनाला याचे कोणतेही सोयरसुतक नाही. याबाबत कोणतीही प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जात नसल्याने नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी पसरली आहे.
शहरात मोकाट कुत्रे, डुकरे व जनावरांची एकूण संख्या किती, याची कल्पना पालिका प्रशासनाला नाही. शहरातील सर्व भागात या मोकाट प्राण्यांचा उपद्रव सुरु आहे. रस्त्यावरून पायी चालणारे पादचारी किंवा दुचाकीवरून जाणार्यांवर दबा धरून बसलेले कुत्रे अचानक हल्ला करतात. वाहनचालकाने या अचानक झालेल्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी वाहनाचा वेग वाढविला तर त्यापेक्षा दुप्पट वेगाने कुत्रे पळत सुटतात. त्यातच दुचाकी चालकाचा वाहनावरील ताबा सुटून वाहन घसरते व अपघात होतो. या अपघातात रस्त्याने चालणाऱ्या निरपराध आबालवृद्धांवर जखमी होण्याची वेळ येते. अनेक नागरिक व वाहनचालकांना याचा चांगलाच अनुभव आहे. कुत्र्यांच्या टोळक्यामुळे पहाटे मोर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणाऱ्या लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आज दिवसभर 6 मार्च 2024 ला समस्या ग्रुप मूल या शहरातील व्हाॅटसअॅप् वर दिवसभर समस्या घूमत दिसल्या
शहरातील वार्ड क्र१४ स्टेट बॅकेच्या मागे गार्डन जवळ डुकराचा हैदोस व कुत्र्याचा हैदोस सुरु आहे. कृपया बंदोबस्त करण्यास नगर परीषदेनी सहकार्य करावे .
ही परिस्थिती पूर्ण मुल मध्ये आहे, श्रमिक नगर दुर्गा मंदिर परिसरात सुद्धा हिच परिस्थिती आहे पण नगरपरिषद ला माहिती असून सुद्धा काहीच करु शकत नाही? हे आपल्या मूल शहराचे दुर्भाग्य🙏🏽
मोकाट डुकरांचा बंदोबस्त केव्हा होणार.. आतापर्यंत तीन कुत्र्यांच्या पिल्लांना मारून टाकले.. सुभाष (श्रीअविनाश जगताप)शाळेच्या पटांगणात… तिथं लहान लहान मुले खेळतात. मोठे मोठे डुक्कर खुप सारे असतात मुलांवर सुद्धा हमला करू शकतात.. त्वरित नगर परिषदेने या गंभीर संमस्ये कडे लक्ष द्यावे..
ओला व सुका कचरा संकलित करण्यासाठी पालिकेने घंटागाड्या सुरु केल्या आहेत. मात्र काही नागरिक शिळे अन्न, उरलेली मटण, चिकनची हाडे घंटागाडीत न टाकता दररोज घरांसमोर मोकळ्या जागेत टाकत असतात. त्यावर डुकरे, मोकाट कुत्री व जनावरे तुटून पडतात. त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला तर ते हल्ला करतात. मोकाट कुत्रे, डुकरे व जनावरांचा मुक्त संचार वाढल्याने शहरात सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. नववसाहती व जुन्या शहरातील गल्लीबोळात मोकाट डुकरे व कुत्रे नागरिकांच्या घरासमोर किंवा बाजूला तुंबलेल्या गटारींमध्ये लोळत असल्याने रोगराई पसरली आहे. एकूणच या मोकाट प्राण्यांमुळे शहरवासीयांच्या आरोग्याचा व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र आहे.






