Home आपला जिल्हा Breaking News नवीन प्रणालीमुळे कागदपत्रांची संख्या वाढलीः लाभार्थ्यांची दमछाक@रेशनकार्ड बनविणे झाले अवघड

नवीन प्रणालीमुळे कागदपत्रांची संख्या वाढलीः लाभार्थ्यांची दमछाक@रेशनकार्ड बनविणे झाले अवघड

118

नवीन प्रणालीनुसार रेशनकार्डसाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. या कागदपत्रांची जुळवाजुळव करताना

मूल तालुक्यातील लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात दमछाक होत आहे. यामुळे सध्या नवीन रेशनकार्ड बनविणे अवघड झाले असल्याचा प्रत्यय येत आहे. सार्वजनिक वितरण धोरणानुसार प्रत्येक नागरिकाला रेशनकार्ड अर्थात शिधापत्रिका देण्यात येते. या कार्डाच्या आधारे जीवनावश्यक वस्तू माफक दरात विकत घेता येतात. दारिद्रय रेषेखालील, दारिद्र्यरेषेवरील, अंत्योदय योजनेतील कुटुंबांना वेगवेगळ्या रंगाचे रेशनकार्ड दिले जाते.

नवीन रेशनकार्ड काढण्यासाठी रहिवासी दाखला, ग्रामपंचायत दाखला, नगरपरिषद दाखला महत्त्वाचा आहे.
रेशनकार्ड सरकारने जारी केलेला एक महत्त्वाचा कायदेशीर दस्ताऐवज आहे. या दस्ताऐवजात प्रविष्ट केलेल्या माहितीच्या आधारावर धान्य वाटप केले जाते.

शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठीही रेशनकार्डमध्ये दिलेल्या माहितीचा वापर करता येते. हे कायदेशीर मान्यताप्राप्त दस्ताऐवज ओळख आणि पत्ता, पुरावा म्हणून वापरले जाऊ शकते. परंतु, आता नवीन प्रणालीनुसार रेशनकार्डसाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता नवीन रेशनकार्ड बनविणे अवघड झाल्याचा प्रत्यय येत आहे.
ही कागदपत्र आवश्यक
गॅसबुकची झेरॉक्स, कुटुंब प्रमुखाच्या बँक खात्याची पहिल्या व शेवटच्या पानाची झेरॉक्स, सर्व युनिटच्या जन्माचा दाखला, शाळेचा दाखला, निवडणूक ओळखपत्र, जातीच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत, नवीन रेशनकार्ड काढण्यासाठी रहिवासी दाखला, ग्रामपंचायत किंवा नगर परिषद दाखला आवश्यक आहे. पूर्वी रेशनकार्ड बनविणे
नागरिकांसाठी खूपच सोपे होते. कमी कागदपत्रांमध्ये ते बनविले जात होते. मात्र, आता
विविध दाखल्यांचा आधार घेत नवीन रेशनकार्ड करावे लागत आहे.
नाव समाविष्ट करणे
आवश्यक
कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे रेशन
कार्डमध्ये समाविष्ट असतातच. अशात, कुटुंब वाढत असतांना, नवीन सदस्यांचे नाव रेशन कार्डमध्ये समाविष्ट करणेही आवश्यक आहे. उदाहरणार्थ, लग्नानंतर, कुटुंबात नवीन सदस्य येतो, तेव्हा किंवा घरात मूल जन्माला आले अथवा दत्तक घेतले तर त्याचे नाव रेशन कार्डमध्येही नोंदविले जाते.