मुल पोलिसांची कारवाई, दोघांना अटक धानाचे पोते चोरी, आरोपी गजाआड
मुल तालुक्यातील चिचाळा येथील पांडुरंग शंकर गुरूनूले यांनी घरातील गोठ्यात १३७ धान्याचे पोते ठेवले होते. दि. १३ जानेवारी २०२४ ला गोठ्यात ठेवण्यात आलेल्या १३७ पोत्या पैकी ८ धाणाचे पोते घटनास्थळावरून चोरी झाल्याचे निर्दशनास आले. यावरून पांडूरंग गुरूनूले यांनी याबाबत गोठ्यातील ८ धानाचे पोते अंदाजे किंमत १२ हजार रूपयाचा माल चोरून नेल्याची तक्रार मुल पोलिस स्टेशन येथे दाखल केली.
यावरून मूल पोलिसांनी गुप्त माहितीच्या
आधारे चौकशी करून चिंचाळा येथील राकेश वसंत कोकोडे (२४) व दिनेश किशोर सोनटक्के या ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी गोठ्यातील ८ पोते धान्य चोरी केल्याचे कबूल केले. यावरून मुल पोलिसात दोन्ही आरोपीविरूध्दा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.






