धान खरेदी केंन्द्र तपासणी आदेश —तहसिलदार अध्यक्ष, तालुका कृषी अधिकारी सदस्य, निरीक्षण अधिकारी सदस्य.सचिव

45

वाचा. 1. अन्न.नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक खरेदी 1123/प्र.क्र./123/ना.पु.29दिनंाक 09 नोव्हेबर 2023

आदेश — ज्या अर्थी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग,शासन निर्णय 09 नोव्हेंबर 2023 मध्ये पणन हंगाम 2023—24 मध्ये किमान आधारभूत खरेदी किंमत योजनेअंतर्गत धान खरेदी प्रक्रियेवर संनियत्रण ठेवण्यासाठी दर्जा नियंत्रण व दक्षताा पथकाची स्थापना करण्याबाबत सूचीत केले आहे.
त्या अर्थी पणन हंगाम 2023—24 मध्ये चंद्रपूर जिल्हयात खरेदी करणा—यात येणा—या धानाचा दर्जा तपासणी करण्यासाठी व धान खरेदी प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी धान उत्पादक तालुकास्तरावर खालील प्रमाणे दर्जा नियंत्रण व दक्षता पथकाची स्थापना करण्यात येत आहे.

तहसिलदार अध्यक्ष, तालुका कृषी अधिकारी सदस्य, निरीक्षण अधिकारी सदस्य.सचिव

वरील दर्जा नियंत्रण व दक्षता पथकाने विशेष मोहिम राबवून त्यांचे तालुक्यांच्या अधिनस्त धान खरेदी केंन्द्राचा व धान साठवणूकीचा गोदामांना अचानक भेटी देवून धानाची पाहणी करावी.

दर्जा नियंत्रण व दक्षता पथकांची कार्य :—

अ) खरेदी करण्यात येणारे धान्य हे एफ. ए.क्यू दर्जाचे असल्याची खातरजमा करणे.
आ) शेतक—यांच्या पिक उत्पादकांच्या प्रमाणात धान खरेदी होत असल्याबाबत खातरजमा करणे.
इ) धान खरेदी केंद्रावर व गोदामामध्ये नवीन एफ एक्यू धानखरेदी/साठवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास तसेच शेतक—यांच्या पिक उत्पादन क्षमतेपेक्षा ज्यादा धानाची खरेदी असल्याचे या शेतक—यांऐवजी व्यापारी/दलाल/निदर्शनास आल्यास मध्यस्थांकडून धान खरेदी होत असल्याचे त्यासाठी जबाबदार असणा—या अधिकारी व कर्मचा—यांची माहिती दर महा या कार्यालयास सादर करणे.
ई) बाहेरील राज्यातील धान खरेदी केंद्रावर विक्री करण्याकरिता येत नसल्याचाबाबत खातरजमा करणे.

                                                                                                                      अजय चरडे

                                                                                                 जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपूर