Home आपला जिल्हा Breaking News पोलिस स्टेशन मूल यांच्या वतीने दि. १ जाने. ते ७ जाने. पर्यंत...

पोलिस स्टेशन मूल यांच्या वतीने दि. १ जाने. ते ७ जाने. पर्यंत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन

160

मूल,
पोलिस स्टेशन मूल यांच्या वतीने दि. १ जाने. ते ७ जाने. पर्यंत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त नव भारत कन्या विद्यालय, माऊंट कॉन्व्हेन्ट , सेंट अनेस कॉन्व्हेन्ट मूल येथील विद्यार्थ्यांना शस्त्राची सखोल माहिती देण्यात येऊन ते कधी व कसे हाताळायचे हे सांगण्यात आले,पोलीस स्टेशन चा कामकाज कसा चालतो याची देखील प्रत्यक्ष माहिती विद्यार्त्याना देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनीही काही प्रश्न विचारले. त्यावर समर्पक उत्तर मूल चे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांनी दिले.

यावेळी आयोजित कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे, प्राचार्य बोल्लीवार , प्राचार्या मिस.शालेत , विजय सिद्धावार सर, पत्रकार अशोक येरमे उपस्थित होते. यावेळी चंद्रपूर वरून बोलावलेली दोन श्वान आणि त्यांचे प्रशिक्षक यांनी पोलिस विभागात श्वानपथकाचे कार्य काय असते याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर करून दाखविण्यात आले.
पोलिस स्टेशन ते गांधी चौक पर्यंत नागरिकांना वाहतुकीचा सुरक्षित सल्ला देण्याच्या उद्देशाने हेल्मेट घातलेला यमराज समोर ठेऊन सोबत पोलीस निरीक्षक सुमित परतेकी, महिला पोलीस उपनिरीक्षक राजश्री रामटेके आणि पोलीस कर्मचारी,सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक, शिक्षिका, रॅली मध्ये सहभागी झाले होते. गांधी चौक मूल येथे यमराजाने नागरिकांना संदेश दिला, मी माझ्या वाहनावर हेल्मेट घालून निघतो, आपणसुद्धा स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेट घालून वाहने चालवावी, असा जीवनावश्यक सल्ला देण्यात आला. व रॅलीची सांगता करण्यात आली.
चीतेगाव येथील कलाकार अमोल उईके यांनी उत्तम यमराज साकारला, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, उत्तम कुमरे, सचिन सायंकार , गणेश आदे, वेदनाथ करंबे, भोजराज मुंढरे, रमेश वाकडे, यांनी अथक परिश्रम घेतले .