Home आपला जिल्हा Breaking News चाऱ्याच्या शोधात चितळ गावात

चाऱ्याच्या शोधात चितळ गावात

94

मूल : चाऱ्याच्या शोधात चितळाचे पिल्लू नवीन वस्तीत आले. हे पिल्लू येथील काही ग्रामस्थांना आढळून आले. वनविभागाचे कर्मचारी आणि प्राणीमित्र उमेशसिंह झिरे यांनी त्याला जाळयात पकडण्याचा प्रयत्न केला.

मात्र चपळ असलेल्या पिल्लूने सगळयांना चकवा देत चंद्रपूर मार्गावरील रेल्वे रूळ ओलांडून जंगलाच्या दिशेने धाव घेतली. शहराला लागूनच जंगलाच्या परिसराला सुरुवात होते.

त्यामुळे येथील वन्यजीव रस्ता भरकटून भरवस्तीत प्रवेश करतात. गावातील कुत्रे पाठीमागे लागत असल्याने त्यांच्या गोंधळात आणखीनच भर पडते.

याआधी सांबर, अस्वल भरवस्तीत निदर्शनास आले होते. एका अस्वलीने रेल्वे रुळाच्या पुलाच्या बोगद्यात पिल्लांना जन्म दिला.