Home आपला जिल्हा Breaking News नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात तालुका प्रशासनाला दिले निवेदन

नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात तालुका प्रशासनाला दिले निवेदन

137

चालक मालक संघटनेचा पुढाकारचालक मालक संघटनेच्या पुढाकारात बुधवारी चालक मालकांनी मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले. हा कायदा रद्द करण्याची मागणी या निवेदनातून केली आहे.
बुधवारी दुपारी तहसिल कार्यालयात जाऊन संघटनेच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. केंद्र सरकारने आणलेला नवीन मोटार वाहन कायदा हा वाहन चालकांसाठी अत्यंत कठोर व जलमी आहे. संपूर्ण परिस्थितीचा
विचार करून हा कायदा रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली.यावेळी  कार्यकर्ते उपस्थित होते.

मूल शहरात जय संघर्ष वाहन चालक- मालक संघटना तर्फे गाड्यांची भव्य अशी रॅली काढून सरकारचा निषेध करत निदर्शने केले. हिट अँड रन या केंद्र सरकारच्या कायद्याच्या मोटार वाहन कायदा विरोधात चालक-मालक संघटना बुधवारी रस्त्यावर उतरली.

अपघात घडल्यास जखमींना मृत्यूच्या दारी सोडून पडून जाणे हे प्रत्येक मानवी मनाला पटण्यासारखे मुळीच नाही परंतु अपघात झाल्यावर वाहन चालकाच्या मनात इमानदारीने अपघातग्रस्तांना मदत करण्याची इच्छा असतानाही विनाकारण वाहन चालकाला होणारी मारहाण वाचवण्यासाठी वाहन चालक पडून जातात स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड करणे हा गुण प्रत्येक प्राणी मात्रा जन्मजात असल्याने एखाद्या कठोर कायद्याचे संरक्षण ड्रायव्हरला नसल्या कारणाने ड्रायव्हर हा केवळ स्वतःच्या जीवाच्या भीतीने अपघात तळावरून पलायन करतो. करिता ड्रायव्हर सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करणे आणि त्यानंतर ही टेंडर या नवीन कायद्यामध्ये कारावासाच्या कालावधी व आर्थिक दंड यामध्ये कमी करून त्यानंतरच कायदा लागू करण्याची मागणी गाडी चालक- -मालक संघटनेनी केली आहे.