यावर्षी शासनाने 1 ऑगस्ट हा महसुल दिन साजरा करण्यासोबतच 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा आठवडा महसुल सप्ताह म्हणुन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने मुल तालुक्याचे तहसीलदार व प्रभारी उपविभागीय अधिकारी मुल डॉ. रविंद्र होळी यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय मुल येथे आज महसुल दिन साजरा करुन महसुल सप्ताहाचा
शहरात महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांची दुचाकी रॅली
महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोटारसायकलवरून तिरंगा रॅली काढली.
महसुल दिनांचे औचित्य साधत तालुक्यातील गरजुंना राशन कार्डचे वाटप करण्यात आले तसेच महसुल प्रकरणात पारित आदेशाच्या अनुषंगाने सुधारित 7/12 संबंधीतांना वितरीत करण्यात आले.तसेच आधार कार्ड व मतदान कार्डचे वाटप काही लाभार्थ्याना करण्यात आले.
02 ऑगस्ट रोजी युवा संवादात लोकशाही व युवा याविषयावरील मुक्त परीसंवादाचे आयोजन केले असुन यात कृषी महाविद्यालय मुल व कर्मवीर महाविद्यालय मुल येथील विद्यार्थी सहभागी होणार असल्याचे सांगितले तर
03 ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा अंतर्गत तालुक्यातील गरजुंना रोख स्वरुपात व वस्तुरुपात मदत करण्यासाठी सर्व महसुल अधिकारी / कर्मचारी आणि तालुक्यातील दानशुर व्यक्तींकडून 31 हजार इतका निधी उभारला असल्याचे सांगितले,
तर 04 ऑगस्ट रोजी मौजा फुलझरी येथे जनसंवादाचे आयोजन केले असुन त्याअंतर्गत संपुर्ण महसुल प्रशासन त्या गावात उपस्थित राहणार असुन तेथील जनतेच्या महसुल विभागाशी तसेच इतर शासकीय विभागाशी संबंधीत समस्या सोडविण्याचे काम मौक्यावरच करणार असल्याचे नमुद केले. तर
5 ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी याअंतर्गत तालुक्यातील आजी माजी सैनिकांच्या महसुल विभागाशी संबंधीत मुख्यता जमीन विषयक वादांचा निपटारा करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले तर
6 ऑगस्ट रोजी महसुल विभागातीलच कार्यरत व सेवानिवृत कर्मचारी यांचेशी संवाद साधुन त्यांच्या प्रलंबित सेवाविषयक बाबी निकाली काढणार असुन
7 ऑगस्ट रोजी महसुल सप्ताहाचा सांगता समारंभ तहसील कार्यालय मुल येथेबाॅईक रॅलीचे आयोजनकरण्यात आलेमहसूल विभागची बाॅईक रॅली प्रशासकीय कार्यालया पासून तरे चंद्रपूर रोड ते नागपूर रोड,गांधी चैक परत तहसील कार्यालय मूल मार्गे निघालेल्या या रॅलीचा समारोप तहसील कार्यालय मुल कार्यालयात झाला. या रॅलीत तहसिलदार यांच्यासह या कार्यालयातील नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, तलाठी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.७ ऑगस्ट या दिवशी महसूल सप्ताह सांगता समारंभात सप्ताहातील विविध उपक्रमांविषयीची फलनिष्पत्ती, विशेष उल्लेखनीय कामकाजाची नोंद घेऊन सांगता समारंभ आयोजित
तसेच राबविण्यात येणा- या महसुल सप्ताहात महसुल विषयक प्रलंबीत प्रकरणे निकाली काढुन घेण्यासाठी पुढे येण्याचे आव्हान उपस्थित नागरीकांना केले. सप्ताह दरम्यान प्रबोधन महाविद्यालयात युवा संवादामध्ये तरुणांना ई-ऑफिस, ई-फेरफार, ई- पीक पाणी, ई- हक्क नोंदणी याबाबत प्रशिक्षण देण्यात
नायब तहसीलदार यशवंत पवार,नायब तहसीलदार ओंकार ठाकरे व ,नायब तहसिलदार नंदकिशोर कुमरे, ,तलाठी ,मंडळ अधिकारी ,कोतवाल, विविध कर्मचारी सदर कार्यक्रमाच्या वेळी संपुर्ण महसुल अधिकारी व कर्मचारी व प्रतिष्ठीत नागरीक मोठया संख्येनी कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ.रविंन्द्र होळी.प्र.उप.वि.अधी.व तहसिलदार,मूल सूत्रसंचालन तलाठी डेझी गायकवाड यांनी प्रास्ताविक नंदकिशोर कुमरे सर यांनी केले, आभार नायब तहसिलदार ओंकार ठाकरे यांनी मानले.