Home आपला जिल्हा Breaking News तलाठी पदांच्या परीक्षेचा मार्ग मोकळा@17 जुलै 2023

तलाठी पदांच्या परीक्षेचा मार्ग मोकळा@17 जुलै 2023

124

आरक्षणाबाबत दिव्यांग कल्याण आयुक्तांकडून हिरवा कंदील
राज्यात तलाठी पदांच्या परीक्षेचा मार्ग मोकळा
पुणे भूमी अभिलेख विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या सुमारे साडेचार हजार पदांसाठीच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या पदांसाठी दिव्यांगांचे आरक्षण डावलून परीक्षा घेण्यात येणार असल्याची तक्रार दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे करण्यात आली होती. मात्र, हे आरक्षण प्रांत स्तरावरून आले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले असून, त्याबाबत दिव्यांग कल्याण आयुक्तांनी हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे ही परीक्षा आता सुरळीत पार पडेल, अशी माहिती राज्याचे जमाबंदी विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते यांनी दिली.
सरकारने तलाठी भरती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, ४ हजार ६४४ पदांसाठी परीक्षा घेण्याचे ठरवले. १७ जुलैपर्यंत अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. मात्र, यासाठी दिव्यांगांचे आरक्षण डावलण्यात आल्याचा आरोप दिव्यांगांच्या संघटनांनी केला होता. त्यानुसार, दिव्यांग आयुक्तांकडे तक्रारही करण्यात आली होती. दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी याबाबत जमाबंदी विभागाकडे खुलासा मागितला होता.
ते म्हणाले, “रिक्त पदांबाबत आदिवासी विकास व मागासवर्गीय विभागाकडून माहितीची खात्री केल्यानंतर परीक्षा घेण्याचे ठरले. मुळात हे आरक्षण प्रांत स्तरावर असते. त्यानुसार, एकूण पदांच्या ४ टक्के जागा दिव्यांगांसाठी आरक्षित असतात. त्यानंतर, प्रत्येक प्रांत विभागातील जागा जिल्हाधिकारी कार्यालयाने एकत्रित करून जमाबंदी विभागाला कळविल्या. याचा सविस्तर अहवाल दिव्यांग कल्याण आयुक्तांना सादर
करण्यात आला.
अडीच लाखांहून अधिक दाखल
■ या पदांसाठी मंगळवारपर्यंत दोन लाख ५९
हजार ५६६ अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची १७ जुलैनंतर छाननी केली जाईल. त्यानंतर, परीक्षा होईल. ऑक्टोबरमध्ये परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही, अशी जमाबंदी विभागाची भूमिका आहे. उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. उमेदवारांसाठी एका मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्याचा लाभ घ्यावा.
– आनंद रायते, अतिरिक्त आयुक्त, जमाबंदी व भूमी अभिलेख विभाग.

जाहिरात क्र.: तलाठी भरती/प्र.क्र./45/2023

Total: 4644 जागा

पदाचे नाव: तलाठी (गट-क)

अ.क्र. जिल्हा  पद संख्या  अ.क्र.  जिल्हा  पद संख्या
1 अहमदनगर 250 19 नागपूर 177
2 अकोला 41 20 नांदेड 119
3 अमरावती 56 21 नंदुरबार 54
4 औरंगाबाद 161 22 नाशिक 268
5 बीड 187 23 उस्मानाबाद 110
6 भंडारा 67 24 परभणी 105
7 बुलढाणा 49 25 पुणे 383
8 चंद्रपूर 167 26 रायगड 241
9 धुळे 205 27 रत्नागिरी 185
10 गडचिरोली 158 28 सांगली 98
11 गोंदिया 60 29 सातारा 153
12 हिंगोली 76 30 सिंधुदुर्ग 143
13 जालना 118 31 सोलापूर 197
14 जळगाव 208 32 ठाणे 65
15 कोल्हापूर 56 33 वर्धा 78
16 लातूर 63 34 वाशिम 19
17 मुंबई उपनगर 43 35 यवतमाळ 123
18 मुंबई शहर 19 36 पालघर 142

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 17 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय:₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जुलै 2023 (11:55 PM)

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट: पाहा