आपले सेवा केंद्र चालकांकडून ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा
पीक विमा एक रुपयात, अर्जासाठी मागतात 01 रुपये @केंद्राला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज ४० रुपये
मुल तालुक्यातील विरई या गावातील अंकूश विजय कंदीकुरवार या शेतक-यांनी व इतर गावातील नागरीकांनी काल दिनांक 06/07/2023 ला आपले सरकार सेवा केंन्द्र प्रगती काॅम्यूटर मूल येथे पिक विम्याचा सर्वे ंनबर 75.3 ऐरीया 0.3 ,0.25 गव्हेमेंन्ट शेयर 957.3399999999999 शेतकरी शेयर 1 रूपये गाव विरई इतक्या रक्मेची पावती सिएसी सेंन्टर वर देण्यात आली.प्रगती काॅम्यूटर संचालीका वैशाली चुनारकर यांनी शेतक-यांना 1 रूपयात आॅनलाईन करून दिल्यामुळे शेतक-यांना खरीप हंगाम २०२३ ते रबी हंगाम २०२५-२६ या तीन वर्षाच्या हंगामासाठी १ रुपयांत पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पीक विम्याकरिता ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा आपले सरकार सेवा केंद्र व बँक शाखेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे १ रुपयात पीक विम्याचा अर्ज करण्यासाठी सेवा केंद्रात जाणाऱ्या शेतकऱ्यांकडून 01रुपये शुल्क आकारल्या जात आहे.
नैसर्गिक आपत्ती तसेच रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन उत्पादनातही घट होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे हे नुकसान टाळण्याकरिता शेतकऱ्यांना पीक विम्याचे संरक्षण दिले जाते. शासनाने यावर्षी केवळ १ रुपयात पीक विम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यानुसार विमा कंपन्यांची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून ३ वर्षांकरिता निवड केली आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२३ करिता ३१ जुलैपर्यंत सहभागी होता येणार आहे. शेतकऱ्यांना प्रतिअर्ज १ रुपया भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करायची आहे. याकरिता शेतकरी आता आपले सेवा केंद्रातून पीक विम्याकरिता नोंदणी करीत असून एका अर्जाची नोंदणी करण्यासाठी सेवा केंद्रांवर 01रुपये घेतले जात असून,
कृषी आयुक्तांनी घेतली दखल….
■ कृषी आयुक्तांनाही काही आपले सरकार सेवा केंद्र चालक शेतकऱ्यांकडून अतिरिक्त रक्कम घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे त्यांनी सर्व कृषी कार्यालयांना पत्र पाठवून शेतकऱ्यांना आवाहन करण्याच्या सूचना केल्या आहे. आपले सरकार सेवा केंद्रचालकाने शेतकऱ्यांकडून केवळ १ रुपया भरून पीक योजनेत सहभागाची नोंदणी करावी. अतिरिक्त रकमेची मागणी केल्यास पीक विमा कंपनीच्या कार्यालय, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यास सांगितले आहे.
विमा कंपनीकडून सेवा केंद्राला ४० रुपये मिळतात
सन २०२३-२४ पासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, शेतकऱ्यांना एक रुपयांत पोर्टलवर स्वतः किंवा बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व आपले सरकार सेवा केंद्रातून सहभाग नोंदणी करता येणार आहे.पीक विमा योजनेत सहभाग नोंदणीकरिता सेवा
केंद्राला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज ४० रुपये देण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांकडून रक्कम घेण्याची आवश्यकता नाही.






