गोंडपिपरीचा रितेश झाला कस्टम इन्स्पेक्टर गोवा येथे पदावर रुजू : परिवारात आनंद
वढोली : सातत्यपूर्ण प्रयत्न आणि परिश्रमाची पराकाष्ठा करण्याची तयारी असेल तर यशाला गवसणी घालता येते. ग्रामीण भागातील अनेक तरुण असे यश मिळवू लागले आहेत. गोंडपिपरी येथील रितेश रेकचंद झाडे या तरुणाने परिश्रमाच्या भरवशावर कस्टम इन्स्पेक्टर पद मिळविले आहे. शुक्रवारी रितेश गोवा येथे या पदावर रूजू झाला. दरम्यान, त्याच्या निवडीची बातमी कळताच परिवारात आनंदाचे वातावरण पसरले.
त्यानेरेकचंद झाडे हे वढोली जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत. त्यांचा मुलगा रितेशने आपले प्राथमिक शिक्षण गोंडपिपरी व बल्लारपूर येथून पूर्ण केले. चंद्रपूरच्या राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनिअरिंगची पदवी घेतली. यानंतर तो स्पर्धा परीक्षेकडे वळला. दरम्यान, त्याने स्टाफ सिलेक्शनची परीक्षा दिली. यात त्याने यश मिळविले व तो पुणे येथे इन्कम टॅक्स विभागात रूजू झाला.
पुणे, सांगली येथे सेवा दिल्यानंतर त्याने कस्टम इन्स्पेक्टर होण्याचे स्वप्न बघितले. याच दृष्टीने प्रयत्न केले. या पदासाठी पुन्हा एकदा रितेशने स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा दिली. दरम्यान, नुकताच या परीक्षेचा निकाल लागला आहे. या परीक्षेत रितेशने घवघवीत यश मिळवत कस्टम इन्स्पेक्टर या पदावर आपले नाव कोरले. सारे सोपस्कार पार पडल्यावर रितेश शुक्रवारी या पदावर गोवा येथे सेवा देण्यासाठी रूजू झाला आहे. महाराष्ट्रातून केवळ सहा तरुणांनी या परीक्षेत यश मिळविले असून, चंद्रपूर जिल्ह्यातून एकमेव उत्तीर्ण होण्याचा मान रितेशने
पटकावलाआहे.प्रत्येकालासंधी मिळते.त्या संधीचं सोनं करणं शेवटीआपल्या हातातअसतं. जिद्द, मेहनत,
—संयम, सातत्य ही यशाची गुरुकिल्लीआहे.– रितेश रेकचंद झाडे






