Home आपला जिल्हा Breaking News बँकेची लिंक फेल, खातेदारांची गैरसोय

बँकेची लिंक फेल, खातेदारांची गैरसोय

101

बँकेची लिंक फेल, खातेदारांची गैरसोय   बेंबाळ येथील व्यवस्थापकाला घेराव
चंद्रपूर . मूल तालुक्यातील बेंबाळ येथील बँक ऑफ इंडिया शाखेत मागील काही दिवसांपासून लिंक फेल असल्याच्या सबबीखाली बँकेचे व्यवहार बंद पडत आहे. लिंक फेलचा फटका सर्व ग्राहकांना बसत आहे. वारंवार बँकेत जाऊनही काम होत नसल्याच्या तक्रारीवरून शिवसेना कार्यकर्ते मधुकर झुंगाजी पवार, पोंभुर्णा तालुका शिवसेना उपप्रमुख जीवनदास गेडाम यांच्या नेतृत्वात ग्राहकांनी एकत्र येत शाखाधिकाऱ्यांना, व्यवस्थापकाला घेराव घातला.
सरकार महिला सक्षमीकरणाच्या हेतूने अनेक योजना राबवत असून, महिलांना स्वयंरोजगारासाठी विविध आहे. योजना आखत आहे. मात्र, बेंबाळ शाखेत गत काही दिवसांपासून बँकेची लिंक नसल्याचे सांगून बोळवण करीत
आहेत. त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः उमेदच्या माध्यमातून अनेक महिला बचत गट कार्यरत असून, या महिलांना वेळोवेळी बँकेत येऊन काम न करताच परतावे लागत सद्यःस्थितीत शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकरी बी- बियाणे खत व इतर साहित्य खरेदीसाठी पैशाला बँकेत अनेकदा जाऊन पैसे मिळत नसल्याने संताप व्यक्त करीत आहे.
वारंवार ग्राहकांच्या तक्रारी समोर येत असल्याने लवकरात लवकर लिंक समस्या निकाली काढावी, अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी मधुकर पवार, योगराज आंबटकर, प्रणय सागर देऊरकर, कुणाल नितीन लोणारे, आर्यन सुधीर हुड, विशाल नरसपुरे, यांच्यासह अन्य नागरिकांची उपस्थिती होती.